हैद्राबाद,
Samantha got her own house साउथ चित्रपटसृष्टीची अभिनेत्री समंथ रूथ प्रभूने तिच्या दुसऱ्या लग्नाची घोषणा करत चाहत्यांना धक्का दिला आहे. १ डिसेंबर रोजी तिने द फॅमिली मॅनचे दिग्दर्शक राज निदिमोरूशी लग्न केले. या लग्नात अतिशय साधी आणि खाजगी पद्धत पाळण्यात आली, फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. समंथाने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, ज्यात ती लाल बनारसी साडी परिधान केलेली दिसत आहे. मात्र, सर्वांचा लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे राजने समंथाला लग्नाच्या दिवशी एक धक्कादायक सरप्राईज गिफ्ट दिले, हैदराबादच्या जुबली हिल्समधील एक सुंदर घर राजने लग्नाच्या दिवशी समंथाला दिले.

समंथाची एंगेजमेंट रिंग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. अहवालांनुसार, या अंगठीची किंमत सुमारे १.५ कोटी रुपये आहे. समंथ आणि राज यांनी सिटाडेल या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांवर प्रेम व्यक्त केले. राजने समंथाच्या तब्येतीबाबतच्या चिंता असतानाही तिला नेहमी पाठिंबा दिला. हे दोन्ही कलाकारांचे दुसरे लग्न आहे. राजचे पहिले लग्न श्यामली डे सोबत झाले होते, जे २०१५ मध्ये झाले आणि २०२२ मध्ये संपले. समंथाचे पहिले लग्न नागा चैतन्य सोबत झाले होते, जे २०१७ मध्ये झाले आणि २०२१ मध्ये संपले.