तभा वृत्तसेवा
राळेगाव,
Sand smuggling तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रातून रात्रीच्या काळोख्यात रेतीची तस्करी वारेमाप सुरू आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून एकाच रॉयल्टीवर रेती भरलेल्या वाहनांच्या खेपा वाढत आहे. याकडे स्थानीक महसूल व पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याची बाब बोरी- मेघापूर रेतीघाट कारवाईतून समोर आली आहे. राळेगाव येथील महसूल विभागाच्या पथकाने रेती तस्करीचे दोन ट्रॅक्टर पकडून 16 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तीन जणांविरुद्ध 1 डिसेंबर रोजी राळेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रांजू पद्माकर खोडे (वय 33), किन्ही जवादे तहसील कार्यालय राळेगाव असे तक्रारदार महसूल कर्मचाèयाचे नाव आहे. तर सूरज विलास खुरपुडे (वय 25), गोंडपुरा राळेगाव असे ट्रॅक्टरमालकाचे तर गणेश विजय मांढरे (वय 24), आष्टा व अभिजित धोबे (वय 32), गोंडपुरा, ता. राळेगाव असे चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी एमएच29 बीव्ही3611 या क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये 7 हजार किंमतीची एक ब्रास रेती उत्खनन करून वाहतूक करीत असताना मिळून आले. ग्राम महसूल अधिकारी प्रांजू खोडे यांनी आरोपिंच्या ताब्यातून 9 लाखांचा ट्रॅक्टर व एक ब्रास रेती असा 9 लाख 7 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसèया कारवाईत खोडे यांनी एमएच29 एके1759 या क्रमांकाचा रेतीतस्करीचा ट्रॅक्टर पकडला. 7 हजारांच्या एक ब्रास रेतीसह 7 लाखांचा ट्रॅक्टर असा 7 लाख 7 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. महसूल विभागाच्या या दोन्ही कारवाईत दोन ब्रास रेती व दोन ट्रॅक्टर असा एकूण 16 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.व जप्तीतील ट्रॅक्टर तहसील कार्यालय राळेगाव येथे जमा करण्यात आले आहे. ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे यांच्या मार्गदर्शनात पथकप्रमुख नायब तहसीलदार नरेंद्र हलामी, मंडळ अधिकारी महादेव सानप, तलाठी नीलेश देवळे, तलाठी प्रांजू खोंडे वाहनचालक बादल पिंपरे यांनी केली.