तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Sanjay Rathod : एक नगर पंचायत व नऊ नगर परिषदेसाठी बुधवार, 3 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. जिल्ह्यातील 2 लाख 24 हजार 309 नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडले. जिल्ह्यात सकाळी 7.30 ते 5.30 पर्यंत 67.84 टक्के मतदान झाले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी. यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. तरीदेखील काही ठिकाणी गालबोट लागले आहे.
आर्णी 66.66 टक्के घाटंजी 75.81 वणी 66.83 दिग्रस 70.80 उमरखेड 66.51 पुसद 61.95, दारव्हा 69.35, पांढरकवडा 69.32, नेर 67.32, ढाणकी नगर पंचायत 77.60 असे एकूण 67.84 टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील 229 नगरसेवकांच्या जागेसाठी 1 हजार 54 उमेदवार तर नगर परिषद अध्यक्षपदासाठी 10 जागांसाठी 76 उमेदवारांचे भाग्य मशीन बंद झाले आहे.
अन् बॅलेटवर मतदान
आर्णी येथील प्रभाग क्रमांक चारमध्ये थोडावेळ गोंधळ उडाला होता. एका बुथवर मशीन बंद पडली होती. याच बुथवर एका महिलेच्या नावावर दुसèयानेच मतदान केल्याचा प्रकार घडला. संबंधित महिला मतदानासाठी आल्यावर हा प्रकार पुढे आला. आपण मतदान केलेच नाही, असे ही महिला ठामपणे सांगत होती. त्यावेळी मतदान केंद्रावरील अधिकाèयांनी खात्री करून घेतली. या महिलेने मतदान केले नसल्याने स्पष्ट झाल्यानंतर तिचे बॅलेटवर मतदान करुन घेण्यात आले.
उमरखेडमध्ये पाच प्रभागात उशीरापर्यंत
शहरातील पाच प्रभागात उशिरापर्यंत मतदान सुरू होते. सकाळी मतदान अतिशय धिम्या गतीने झाले. दुपारी गती वाढली आणि चार वाजतानंतर मतदारांची गर्दी झाली. सायंकाळी 5.30 वाजतापर्यंत सरासरी 62 टक्के मतदानाची नोंद झाली होती. भाजपा-जनशक्ती पॅनल, एमआयएम, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) यांचे उमेदवार आहेत.