अरे... शाहरुख खानची मार्कशीट व्हायरल

चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Shahrukh Khan marksheet बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. रोमॅन्सचा राजा, बॉक्स ऑफिसचा किंग आणि जगभरातील लोकप्रियतेमुळे तो सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीतही अग्रस्थानी आहे. मात्र, एक काळ असा होता की शाहरुख साधा कॉलेज विद्यार्थी होता. सध्या त्याच्याच शिक्षणकाळातील एक महत्त्वाची आठवण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, शाहरुखचा हंसराज कॉलेजमधील मार्कशीट चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
 

Shahrukh Khan marksheet 
हा मार्कशीट शाहरुख खानने 1985 ते 1988 दरम्यान दिल्ली विद्यापीठातील हंसराज कॉलेजमध्ये अर्थशास्त्र शाखेत पदवी घेत असतानाचा असल्याचे समजते. या मार्कशीटनुसार, शाहरुखने काही विषयांत तब्बल 92 गुण मिळवत उत्तम यश मिळवले होते. गणित आणि भौतिकशास्त्रात त्याला प्रत्येकी 78 गुण मिळाले. मात्र, इंग्रजी विषयात त्याला केवळ 51 गुण मिळाल्याने त्याची ही कमकुवत बाजू चाहत्यांना आश्चर्यचकित करणारी ठरली. तरीही अधिकांश विषयांत त्याची कामगिरी उल्लेखनीय होती.
 
 
या मार्कशीट व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी किंग खानबद्दल प्रशंसात्मक प्रतिक्रिया देत त्याच्या कष्टमय प्रवासाची पुन्हा एकदा आठवण काढली. साध्या विद्यार्थ्यापासून जागतिक स्तरावरील सुपरस्टार होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास प्रेरणादायी असल्याची भावना त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली.
 
 
पदवी पूर्ण Shahrukh Khan marksheet केल्यानंतर शाहरुख खानने जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, नशिबाने त्याला अभिनयाच्या जगात खेचून आणले. दूरचित्रवाणी मालिकांमधून सुरुवात करत अखेर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत त्याने जगभर गाजलेले करिअर घडवले.शाहरुखच्या करिअरचे चाहते आजही पुढच्या सिनेमाची आतूरतेने वाट पाहत आहेत. लवकरच ‘किंग’ या आगामी चित्रपटातून शाहरुख खान मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात तो पहिल्यांदाच आपल्या लेक सुहाना खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे हा सिनेमा चाहत्यांसाठी खास ठरणार असून, सोशल मीडियावर त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मार्कशीटनं शाहरुखच्या चाहत्यांना त्याच्या जुन्या आठवणींशी पुन्हा जोडले असून, किंग खानचा विद्यार्थी ते सुपरस्टार असा प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.