श्रीक्षेत्र तर्‍हाळा येथे दत्त जयंती निमित्त प्रभु श्री राम भरत भेट यात्रा

१५१ वर्ष जुनी परंपरा

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
मंगरूळनाथ,
Datt Jayanti festival मंगरुळनाथ तालुयामध्ये तर्‍हाळा येथे एक विषेश सनातन धार्मिक सोहळा आयोजीत करून यात्रा भरविली जाते. प्रभु श्री राम आणि भरत यांच्या भेटीच्या सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित राहतात.
 

Datt Jayanti festival 
तालुयातील तीर्थक्षेत्र तर्‍हाळा Datt Jayanti festival  येथे प्रभु श्री राम व भरत भेट यात्रा महोत्सवानिमीत्त २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते म्हणून अनंत धोंडोपंत शास्त्री ब्रह्मपुरी यांनी जबाबदारी घेतली आहे. सप्ताहाची सांगता ४ डिसेंबर रोजी महाप्रसादाने होणार आहे. याच दिवशी रात्री ९.३० ते ११ या वेळेत शिवा महाराज बावस्कर यांचे विनोदी कीर्तन कार्यक्रम राहील. सकाळी भागवत ग्रंथाची समाप्ती भागवत पूजा नंतर दुपारी तीन वाजता पासून महाप्रसाद होईल. ५ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता श्रीराम मंदिरासमोर प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, हनुमान, भरत व शत्रुघ्न यांची भेट होईल. तर्‍हाळा येथील प्रभु श्री राम भरत भेट यात्रा ही संत भाईजी महाराज यांनी १५१ वर्ष आधी सुरू केली होती. तेव्हापासून ही प्रथा आजतगायत सुरू असून, रामायणातील भरत आणि प्रभू राम यांच्या भेटीचे प्रतीक ही भेट आहे. चित्रकूट येथे प्रभू श्री राम आणि भरत यांची भेट झाली होती. या यात्रेमुळे धार्मिक आणि पौराणिक वारसा जतन केला जातो. या यात्रेला संस्कृतिक महत्त्व असल्याची मान्यता आहे. याप्रसंगी लहान मुलांना प्रभु श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न व हनुमान यांची वेशभूषा दिली जाते. ५ डिसेंबर रोजी सकाळी ४ वाजता आरती होईल. दुपारी १२ वाजता संत भाईजी महाराज जीवन चरित्र या सहाव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा श्रीराम महाराज तराळकर अकोला यांचे हस्ते होईल. यात्रा उत्सवाचे औचित्य साधून भव्य दिंडी स्पर्धेचे आयोजन केले असून, त्यामध्ये विविध बक्षिसेही सहभागी मंडळांना देण्यात येणार आहे. या यात्रोत्सवातील कार्यक्रमाचा लाभ भकतांनीे घ्यावा, असे आवाहन प्रभु श्रीराम भरत भेट यात्रोत्सव समिती व ग्रामस्थांनी केले आहे.
कौटुंबिक ऐय आणि बंधुभाव
ही यात्रा रामाच्या Datt Jayanti festival  वनवासादरम्यान भरताने रामाचा शोध घेण्यासाठी केलेली हृदयस्पर्शी भेट दर्शवते. त्यामुळे कौटुंबिक नातेसंबंधांमधील प्रेम आणि एकतेचे महत्त्व स्पष्ट होते. धार्मिक आणि पौराणिक महत्त्वही या यात्रेने अधोरेखीत होते. चित्रकूट येथे प्रभू श्री राम आणि भरत यांची भेट झाली होती. या यात्रेमुळे धार्मिक आणि पौराणिक वारसा जतन केला जातो. या यात्रेला संस्कृतिक महत्त्व असल्याची मान्यता असून, या यात्रेमुळे स्थानिक संस्कृती आणि परंपरा जिवंत राहतात. लोकांमध्ये यात्रेबद्दल उत्साह आणि श्रद्धेची भावना निर्माण होते. ही यात्रा केवळ एक धार्मिक विधी नसून, ती प्रेम, कर्तव्य आणि नात्यांची खोली दर्शवणारे एक शक्तिशाली प्रतीक आहे. भरत आपल्या भावाच्या प्रती असलेल्या प्रेमापोटी अयोध्येचा राज्य कारभार स्वीकारण्यास तयार नसतो. या प्रसंगातून याची प्रचिती येते. अशी भाविक भक्तांची धारणा आहे.