मानोरा,
Soybean procurement issue Manora, तालुयामध्ये एकूण क्षेत्रापैकी ५० टक्के पेक्षा अधिक उत्पादन घेण्यात येणार्या सोयाबीन पिकाच्या खरेदीसाठी शासनाकडून नाफेड चे खरेदी केंद्र सुरू न करण्यात आल्यामुळे शेतकर्यांची घामाची कमाई मातीमोल दराने व्यापार्यांकडून लुटली जात असल्याचे निवेदन शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी बाळू राठोड यांनी तालुका प्रशासनाकडे करून अति तातडीने ही खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.
नैसर्गिक आपदेने पोळलेल्या मानोरा तालुयातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची पेरणी यावर्षी केली होती. आस्मानी संकटाचा सामना करून पिकविलेला सोयाबीन हा पीक घरी आल्यानंतर शासनाच्या हमीदराने नाफेड केंद्रामार्फत खरेदी केल्या जाऊन खरीप पेरणी करता झालेला खर्च काही प्रमाणात निघेल व पुढील रब्बी हंगामाचे नियोजन करता येईल ही आशा तालुयात नाफेड खरेदी केंद्र शासनाकडून सुरूच न करण्यात आल्याने हवेत विरून शेतकर्यांना नाईलाजाने मातीमोल दराने खाजगी व्यापार्यांना पिकविलेला सोयाबीन विकावा लागत आहे.
कुटुंबाचे उदरनिर्वाह, खाजगी सावकारांकडून घेतलेला कर्ज, मुला मुलींचे शिक्षण, विवाह आदी अनेक कामांसाठी सोयाबीन उत्पादक शेतकर्यांकडे पैशाची गरज असते. मात्र नाफेड खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे वरील कामांसाठी इच्छा नसताना शेतकर्यांना अत्यल्प दरात सोयाबीन विकावा लागून आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्यामुळे तालुयात तातडीने नाफेड द्वारा सोयाबीनची खरेदी करणारे केंद्रे सुरू करण्याची मागणी बाळू राठोड यांनी निवेदनाद्वारा तालुका प्रशासनाकडे केली आहे.