तभा वृत्तसेवा
राळेगाव,
Teachers Association support शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने 5 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या शाळा बंद आंदोलनाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे. या आंदोलनात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाèयांच्या वतीने खालील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. सरसकट सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्णची अट रद्द करणे, 15 मार्च 2024च्या संचमान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करून त्या अनुषंगाने समायोजन प्रक्रिया रद्द करणे, 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व विभागातील कर्मचाèयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांना 10, 20, 30 ची आश्वासित वेतन योजना लागू करावी, शिक्षणसेवक पद रद्द करून सुरवातीपासून शिक्षकांची कायम नेमणूक करणे, अशाप्रकारच्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या मागण्या असून अशा आशयाच्या मागण्या घेऊन 5 डिसेंबर रोजी होणाèया शाळा बंद आंदोलनाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे.
या आंदोलनात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी व आजीवन सदस्यांनी आंदोलन, मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.