भारताला सामर्थशाली बनविण्यासाठी स्वदेशीचा संकल्प करा: प्रा. विजय जोशी

*स्वदेशी जागरण मंच आयोजित स्वदेशी संकल्प रथ यात्रेचे शहरात स्वागत

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
बुलढाणा, 
vijay-joshi : आत्मनिर्भर स्वावलंबी सुरक्षित भारत निर्माणासाठी स्वदेशी मुलमंत्राचा अंगिकार करणे वर्तमान काळाची आवश्यकता आहे. भारतीय संस्कृती, पंरपंरा, राष्ट्रीय अस्मित, राष्ट्राभिमान, जपण्यासाठी प्रत्येक नागरीकाने स्वदेशी जीवन शैलीचा स्वीकार करणे राष्ट्रीय कर्तव्य पालनच होय. भारत मातेला विकसीत, संघटीत, सामर्थशाली बनवण्यासाठी, भारताला विश्वगुरु पदी विराजमान करण्यासाठी स्वदेशीचाच संकल्प करावा, असे आवाहन संस्कृत भारती, विभाग संयोजक प्राध्यापक विजय जोशी यांनी उपस्थितांना केले.
 
 
j
 
स्वदेशी जागरण मंच आयोजित स्वदेशी संकल्प रथ यात्रा (नागपुर) स्वागत समारंभ प्रसंगी मार्गदर्शक करीत होते. व्यासपीठावर या प्रसंगी बुलढाणा विभाग संघसंचालक चित्तरंजन राठी, स्वदेशी जागरण मंच विदर्भ प्रांत, संयोजक शिवाजी भालतिलक योगतज्ञ, डॉ. उमेश सांखला, नगरसंघसंचालक महेश पेंडके उपस्थित होते.
 
 
 
उपरोक्त स्वदेशी संकल्प रथ यात्रा ही संपूर्ण विदर्भात प्रवासात आहे. दि.०३ ते ०७ डिसेंबर-बुलडाणा, चिखली आदी शहरात जाणार आहे. दि. ३ डिसेंबर बुधवार ला सकाळी ८ वाजता शहरातील केशव नगर स्थित फुलबाग, बाल मंदीर मैदानावर हा स्वागत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमात विभाग संघचालक चित्तरंजन राठी, डॉ. उमेश सांखळा यांनी राष्ट्र जीवनात स्वदेशी चे महत्व आयुर्वेद व योगाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विविध सामाजिक संस्था, पदाधिकारी बंधु व भगीनी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय संचनल, शिवाजी भालतिलक यांनी केले. स्वदेशी संकल्प यात्रा स्वागत समारंभ यशस्वीतेसाठी सर्वश्री, शैलेश कमाती, रविंद्र जाधव, संदीप जाधव, अजित गुळवे, विशाल ढवळे, प्रविण माईनकर (यात्रा प्रमुख) प्रविण सावजी जयंत कुळकर्णी, गोविंद वंडाळे, नितीन देशपांडे, विजयाताई राठी, अर्पना साबदे, . उज्वला गायकवाड, पूर्वा जयस्वाल, साधना पावडे, मनिषा गायकवाड, चंद्रकांत पाधरकर, शिवप्रसाद बोरंबळे, प्रतिक गवळी, रितेश जोशी, काशिनाथ शिंदे, पंकज देशमुख, विश्राम पवार, भास्करराव बाहेकर, अशोक पाठक, राजु घुले, संदेश सपकाळ, मकरंद देशपांडे उपस्थित होते.