वाशीमचा बालवैज्ञानिक विराज शिंदेची राष्ट्रीयस्तरावर निवड

इंन्सपायर मानक टिमकडून कौतुक

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
वाशीम,
Viraj Shinde national selection वाशीमचा बाल समुपदेशक, दिव्यांग बाल शास्त्रज्ञ विराज शिंदेचे इंन्सपायर मानक टिमकडून भरभरून कौतुक झाले आहे. त्यांच्या सर्वच क्षेत्रातील विशेषतः समुपदेशक कार्याचाही गुण गौरव करण्यात आला होता.२७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथे राज्यस्तरीय पात्रतेसाठी भाग घेतला होता. त्यामध्ये जिल्हास्तरावर जिंकून आलेले ३७५ पेक्षा जास्त मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रातून सहभागी झाले होते. त्यातून विविध निकषांवर शास्त्रज्ञ जजिंग पॅनलने ३४ जणांची निवड दोन वर्षांतून केली आहे. दोन वर्षांचे एकत्रित राज्यस्तरीय प्रदर्शन होते. त्यामध्ये वाशीमचा एकमेव दिव्यांग विराजचे भरभरून कौतुक ही वाशीमकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
 

Viraj Shinde national selection 
 
 
विराजचा इंस्पायर Viraj Shinde national selection अवार्डचा प्रवास हा खुपचं संघर्षाचा ठरला. त्याच्या संशोधनावर झाली टिका, मागील शाळेचा व मार्गदर्शकाचा असहकार, प्रचंड तणाव व प्रोजेट पुर्ण करतांना वेळेची कमतरता यामुळे काहीश्या खचलेल्या विराजच्या मदतीस सामान्य वाशीमकर धावून आलेत. कौतुक करत साहित्याची उपलब्धता करून देत सर्वोतोपरी मदत केली. त्यामुळे माझ्या यशात वाशीमकरांचा वाटा आहे,असे तो म्हणतो.
 
 
यामध्ये शिक्षणाधिकारी मंगला धुपे , संजय ससाणे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव वर्ल्ड स्कूलचे संचालक बाजड व मुख्याध्यापक सुतावणे, माजी प्राचार्य शास्त्रज्ञ विजय भड, आर. ए. कॉलेजचे कॉम्पुटर डिपार्टमेंटचे प्रा.गवळी व प्रा. ठाकूर, निशांत पाखरे, जिल्हा रुग्णालयातील कार्यरत रामकृष्ण धाडवे आदींनी विनामूल्य तर कोणी अल्पमुल्यात मदत केली व त्याच्या कल्पनेतील संशोधन पूर्ण केले. विशेष म्हणजे इंस्पायरचे समन्वयक विजय भड, तारांगण इंग्लिश स्कूल धनज बु, भाऊ एस.पी.ए विजयवाड्याचा विद्यार्थी शंतनु शिंदे व माता पिता यांनी विराजला योग्य व वेळेवर सहकार्य व प्रोत्साहन दिले. यासाठी मी नॅशनलमध्ये वाशीम जिल्हाचे नाव उंचावणार असा विश्वास विराजने व्यक्त केला आहे. आता महाराष्ट्राच्या नावासाठी मला जबाबदारीने काम करायला हवे असे मत विराजने व्यक्त केले आहे.