मुंबई,
Virat to play in Vijay Hazare Trophy क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह पसरवणारी बातमी आहे की, विराट कोहली अखेर २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीत खेळण्यासाठी तयार झाला आहे. अनेक वर्षांनंतर विराट पुन्हा लिस्ट-ए घरगुती स्पर्धेत मैदानात उतरतोय. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला विराटने आपली उपलब्धता कळवली आहे.
कोहलीने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतो, जिथे तो प्रत्येक सामन्यासाठी ६ लाख रुपये कमावतो. मात्र, विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना तो प्रत्येक सामन्यासाठी ६०,००० रुपये कमावणार आहे. विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या संघासाठी खेळेल. दिल्लीच्या वेळापत्रकानुसार, २४ डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशशी सामना, २६ डिसेंबर रोजी गुजरातशी, २९ डिसेंबर रोजी सौराष्ट्रशी, ३१ डिसेंबर रोजी ओडिशाशी, ३ जानेवारी रोजी सर्व्हिसेसविरुद्ध आणि ६ जानेवारी रोजी रेल्वेशी सामना खेळणार आहे. अंतिम सामना ८ जानेवारी रोजी हरियाणाशी होईल.
सूत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहली संपूर्ण विजय हजारे ट्रॉफी खेळणार नाही. तो फक्त तीन सामने खेळू शकतो. त्यात पहिले दोन सामने आणि ६ जानेवारी रोजी रेल्वेविरुद्धचा सामना समाविष्ट आहे. विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीत खेळण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये असलेल्या वरिष्ठ खेळाडूंप्रमाणे मॅच फी मिळेल. तीन सामने खेळल्यास तो एकूण १,८०,००० रुपये कमावू शकतो.