मिनीमंत्रालय ई-ऑफीस झाले पण तक्रारीचे ‘काय’

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
mini-ministry-e-office : जिल्हा परिषदेचे काम तत्काळ निकाली काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी ई-ऑफीस हा उपक्रम सुरू केला आहे. यातून मात्र, कर्मचाèयाच्या तक्रारीचा निपटारा होत नाही. नुकतेच एका विभागातील महिला कर्मचाèयांनी तक्रार केली त्यावर अद्यापही कोणतीच कारवाई झाली नसल्याने सीईओंच्या उपक्रमाबाबत उलटसुलट चर्चा होत आहे.
 
 

y3Dec-Z-P-Logo 
 
 
जिल्हा परिषदेमार्फत केंद्र व राज्य सरकारच्या लाखो रुपयांच्या योजना राबविण्यात येतात. मात्र, काही कर्मचाèयांच्या कार्यपद्धतीमुळे या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागाचे काम आभासी (ई-ऑफीस)केले. यात कोणती फाईल कधी आली कोणत्या टेबलवर किती दिवस राहील, याची माहिती होते. मात्र, यातून कर्मचाèयांनी केलेल्या तक्रारीची नोंद होत नाही.
 
 
नुकतेच एका विभागातील महिला कर्मचाèयांनी चक्क मुख्य कार्यकारी अधिकारी पत्की यांच्या नावाने पुरुष कर्मचारी अश्लील शिवीगाळ करत असल्याची तक्रार केली आहे. यावर मात्र, अद्यापही कोणतीच कारवाई झाली नसल्याने पाणी कुठे मुरले याबाबत उलटसुलट चर्चाला उधाण आले असून, हेच का तुमचे ई-ऑफीस, अशी म्हणण्याची वेळ आता कर्मचाèयांवर आली आहे.