गाझियाबाद उघडपणे वाटल्या तलवारी!

६ हिंदू रक्षा दल कार्यकर्त्यांना अटक

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
गाझियाबाद,
6 Hindu Raksha Dal activists arrested. राष्ट्रीय राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद जिल्ह्यातील शालीमार गार्डन कॉलनीत सोमवारी उघडपणे दोन डझनाहून अधिक तलवारी वाटल्याची आणि भडकाऊ घोषणा केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी हिंदू रक्षा दल या संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पोलीस उपायुक्त (ट्रान्स-हिंदोन) निमिश पाटील यांच्या माहितीनुसार, संघटनेचे अध्यक्ष भूपेंद्र चौधरी उर्फ पिंकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कॉलनीतील कार्यालयातून लोकांना तलवारी वाटल्या, मिरवणूक काढली आणि प्रक्षोभक घोषणा केल्या. पिंकीसह १७ जणांच्या नावावर आणि २४ हून अधिक अनोळखी कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपी पिंकी चौधरी सध्या फरार आहे.
 
 
 
6 Hindu Raksha Dal
 
आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १९१(२), १९१(३), १२७(२) तसेच फौजदारी कायदा सुधारणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शालीमार गार्डन कॉलनीत आरोपींच्या लपण्याच्या ठिकाणी छापे टाकत परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपी हिंदूत्ववादी असून मुस्लिमविरोधी घोषणाही देत होते. नेत्यांनी परिसरात जाऊन घराघरांत सुमारे दोन डझन तलवारी वाटल्या. हिंदू रक्षा दलाच्या अध्यक्ष पिंकी चौधरी यांनी व्हिडिओ जाहीर केला असून त्यात म्हटले आहे की, “हिंदू कुटुंबांवर हल्ला करणाऱ्या आणि हिंदू मुली व महिलांना त्रास देणाऱ्यांना रोखण्यासाठी २५० शस्त्रे वाटण्यात आली आहेत.”