अधिकृत उमेदवारांविरुद्ध काम करणाऱ्यांवर कारवाई करा

काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि स्थानिक नेतृत्वाकडे तक्रार दाखल

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
yavatmal-news : यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार आणि पक्षविरोधी काम करणाèया यवतमाळ मधील पक्षाचे तथाकथित नेते अब्दुल जाकीर अब्दुल करीम यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
 
 

y30Dec-Takraar 
 
 
या संदर्भात प्रभाग 16 मधील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार राहिलेल्या नाहीद अंजुम सय्यद वाहिद,स्थानिक काँग्रेस नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, प्रभारी रमेश चेन्निथला, के.सी.वेणुगोपाल,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,प्रदेश काँग्रेस कमिटी प्रशासक गणेश पाटील यांच्याकडे लेखी तक्रार ईमेलद्वारे पाठविली आहे.
 
 
या तक्रारीनुसार, यवतमाळ नप निवडणुकीत काँग्रेसपक्षाने नगराध्यक्ष पदासाठी प्रा. प्रियंका जितेंद्र मोघे आणि प्रभाग क्रमांक 16 मधून नाहीद अंजूम सैय्यद वाहेद यांना अधिकृत उमेदवारी दिली होती.पण स्वतःला काँग्रेस नेते म्हणविणारे अब्दुल जाकीर आणि त्यांच्या सहकाèयांनी या प्रभागात उघडपणे काँग्रेसच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांविरोधात आणि एमआयएम उमेदवाराचा प्रचार करीत सहकार्य केले.
 
 
त्यामुळे येथे काँग्रेस उमेदवारांना पराभूत व्हावे लागले. विशेष म्हणजे, माजी खासदार विजय दर्डा यांच्या शिफारशीवरून प्रभाग 16 मधून नाहीद अंजूम यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, अब्दुल जाकीर यांनी पक्षाच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या या निर्णयाला पक्षविरोधी कारवाई करून हरताळ फासला आणि काँग्रेस उमेदवारांविरुद्ध उघडपणे दुष्प्रचार केला.प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेस उमेदवारांच्या पराभवाला अब्दुल जाकीर यांनी एमआयएम उमेदवाराचा केलेला सक्रिय प्रचार कारणीभूत असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
 
 
या भागात स्वतःला काँग्रेसचे नेते समजणाèया अब्दुल जाकीर यांच्याकडे सध्या काँग्रेसचे कोणतेही अधिकृत पद नसताना पण स्थानिक आमदारांच्या जवळचे असल्याचे भासवून त्यांनी कार्यकर्त्यांची दिशाभूल केली. काँग्रेसमध्ये असल्याचे दाखवणाèया या लोकांनी प्रत्यक्षात पक्षाच्या उमेदवारांचे पाय खेचण्याचे काम केले, ज्यामुळे प्रभाग 16 मध्ये एका जागेवर काँग्रेसला पराभूत व्हावे लागले,यामुळे काँग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे.
 
 
या महत्वाच्या निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा जिंकण्याची अपेक्षा आणि गरज असताना या लोकांनी अशा प्रकारे काँग्रेस उमेदवारांना नुकसान पोहोचविण्याचे काम केले.या गंभीर शिस्तभंगामुळे पक्षाचे मोठे राजकीय नुकसान झाले आहे. त्यामुळे अब्दुल जाकीर यांना तात्काळ ’कारण दाखवा’ नोटीस बजावण्यात यावी आणि भविष्यात त्यांना पक्षाच्या कोणत्याही जबाबदार पदासाठी किंवा उमेदवारीसाठी अपात्र घोषित करावे, अशी मागणी वरिष्ठ नेतृत्वासह काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, काँग्रेचे वरिष्ठ नेते माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे,वसंतराव पुरके,माजी आमदार कीर्ती गांधी आणि स्थानिक काँग्रेस नेत्यांकडेही लेखी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.स्थानिक राजकारणात या तक्रारीमुळे मोठी खळबळ उडाली असून, आता काँग्रेस यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.