भंडारा,
nylon-kite-string-strict-action : पक्षी,प्राणी आणि मनुष्यांना नायलॉन मांजा पासून प्रचंड धोका आहे. या मांजाचा वापर आणि विक्री यावर बंदी असून उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे दंडाची मोठी कारवाई प्रस्तावित आहे. त्यामुळे कुणीही या मांज्याचा वापर करू नये असे भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आज शहरात कारवाई करीत 16 चक्री नायलॉन म्हणजे जप्त केल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नायलॉन मांजा चा वापर आणि प्लास्टिक बंदी या विषयाला घेऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे नायलॉन मांजाच्या वापरावर बंदीचा कायदा अनेक वर्षांपासून असतानाही अंमलबजावणी होत नाही. तो कठोर करण्याच्या दृष्टीने आता नायलॉन मांजाद्वारे पतंग उडविणाऱ्या लहान मुलांच्या वडिलांना किंवा मोठ्या व्यक्तींना 50 हजार रुपये दंड तर विक्रेत्यांना अडीच लाख रुपये दंड आकारण्याचे प्रस्तावित आहे. संदर्भात 05 जानेवारी रोजी सुनावणी आहे. न्यायालयाचे आदेश असल्याने नायलॉन मांजाचा वापर नागरिकांनी करू नये असे यावेळी जुम्मा प्यारेवाले म्हणाले.
चार दुकानांवर धाड टाकण्यात आली. एका दुकानात 16 चक्री नायलॉन मांजा जप्त करण्यात आल्याचे, त्यांनी सांगितले. शहरात प्लास्टिक बंदी भावी पने राबविण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात येणार आहे. प्लास्टिक बंदी सह दुकानदारांनी पत्र्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कचरापेटीचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले असून या दुकानात अशा कचरापेट्या दिसणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले. कुठल्याही व्यवसायिकाच्या प्रतिष्ठानासमोर पडलेला कचरा सहन केला जाणार नाही, असेही ते म्हणाले. मांजा विक्रेता, अन्य व्यवसाय आणि नागरिकांनी नगरपरिषदेच्या या कामात सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.