हिंगणघाट,
bharat-vidyalaya-hinganghat : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने सिंचाई भवन वर्धा येथे २८ डिसेंबर रोजी विभागीय आष्टेडू आखाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत येथील भारत विद्यालयातील तीन खेळाडूंची राज्यस्तरीय आष्टेडू आखाडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत भारत विद्यालयातील सहा खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यापैकी १४ वर्षे वयोगटांमध्ये तीर्थ विनोद लांडे, उत्कर्ष मनोज वराडे, अथर्व रमेश नामेवार यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड निश्चित केली.
या विजयी खेळाडूंच्या अप्रतिम कामगिरीबद्दल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोकुलदास राठी, उपाध्यक्ष श्याम भिमनवार, सचिव रमेश धारकर, मुख्याध्यापक हरीश भट्टड, उपमुख्याध्यापक किशोर चवरे, पर्यवेक्षक मनीषा कोंडावार, निलाक्षी बुरीले, क्रीडा विभाग प्रमुख विनोद कोसुरकर, क्रीडा शिक्षक संदीप चांभारे, संजना चौधरी तसेच सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या