भंडारा,
chain-snatching-gang : जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या तीन चेन चोरीच्या घटनेतील गुन्ह्यांचा उलगडा होऊन छत्तीसगड राज्यातील चार आरोपींना भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चेन चोरणारी ही आंतरराजीय टोळी असल्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितले.
जवाहर नगर पोलीस ठाणे अंतर्गत 27 खरबी येथे एका मुलीच्या गळ्यातील चेन चोरीची घटना घडली होती. अन्य दागिनेही यावेळी करून देण्यात आले होते. आय ट्वेंटी कार मधून आलेल्या चार जणांनी ही चोरी केली होती. जवाहर नगर पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता. या घटने शिवाय आणखी एक घटना याच पोलीस ठाणे अंतर्गत कारधा पोलीस ठाण्यांतर्गत झाली होती. खरबी येथील घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हाती घेऊन या प्रकरणातील आरोपींना छत्तीसगड राज्यातून अटक केली.
आशिष भट्टाचार्य, शुभम सोनी, सौरभ बंजारा आणि दीपिका गंगाबेर पोलिसांनी अटक केली. या अटकेनंतर अन्य दोन गुन्ह्याची कबुली सुद्धा या आरोपींनी दिली आहे. आरोपींकडून आठ लाख 50 हजाराचा मुद्देमाल तपास जप्त करण्यात आल्याचेही पोलीस अधीक्षक हसन यांनी सांगितले. ही आंतरराजीय टोळी असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, प्रॉपर्टी सेल पथकातील प्रभारी अधिकारी विवेक सोनवणे, पोलीस हवालदार डहारे, देशमुख यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.