नागपूर,
Dhanwate National College पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये २५ डिसेंबरला ‘आनंद मेळावा’ व सलाद डेकोरेशन स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शक म्हणून डॉ. स्वाती वैद्य उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारले असून त्यांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Dhanwate National College ख्रिसमस गीतं, वेषभूषा स्पर्धा, मनोरंजनात्मक फनी गेम्समुळे कार्यक्रम रंगतदार ठरला.सलाद डेकोरेशन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी फळे व भाज्यांपासून आकर्षक कलाकृती साकारल्या. डॉ. स्वाती वैद्य यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत संतुलित आहार व कलात्मकतेचे महत्त्व अधोरेखित केले.प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रा. माधुरी राऊत, डॉ. चेतन राऊत, प्रा. मयुरी ठाकरे यांचे योगदान लाभले, तर आभार प्रा. स्मिता शहाणे यांनी मानले.
सौजन्य :अश्विनी वानखेडे,संपर्क मित्र