अभय इंगळे
दिग्रस,
digras-municipal-council : नगर परिषद निवडणुकीचा अधिकृत गोषवारा नुकताच जाहीर झाला. यात शिवसेना (शिंदे गट) हा पक्ष मतदारांच्या पसंतीस उतरला हे स्पष्ट दिसून येते. कारण एकूण झालेल्या मतदानापैकी 48.69 टक्के मतदान एकट्या शिवसेना पक्षाला मिळाल्याने मतदाराचा कौल शिवसेनेलाच दिसला.
शिवसेनेकडून नगर परिषद निवडणूक रिंगणात 1 नप अध्यक्षांचा उमेदवार व 25 नगरसेवक पदाचे चांगले उमेदवार उतरवले होते. त्यांच्या पाठीमागे या विभागाचे आमदार तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची भक्कम ताकद होती. त्यांनी आजवर केलेली विकास कामे या निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे झाले आणि ते मतदारांच्या पसंतीस उतरल्याचे स्पष्ट जाणवत आहे. एकूण झालेल्या 26 हजार 704 मतदानापैकी 13 हजार 3 इतके मतदान शिवसेनेला पडले. 25 पैकी 16 नगरसेवक निवडून आले तर अगदी अल्प मतांनी म्हणजेच 62 मतांच्या फरकाने नप अध्यक्ष उमेदवाराचा पराभव झाला. मात्र मतदान घेण्यात शिवसेनेलाच यश मिळाल्याचे दिसून येत आहे.
मातृशोकामुळे संजय राठोड निवडणूक प्रक्रियेत सहभागी नव्हते. मात्र त्यांच्या खंद्या समर्थकांनी निवडणुकीची लढाई जिंकून दाखवली. शिवसेनेतील निष्ठावंतांच्या कामगिरीची किमया म्हणजेच शिवसेनेला 48.69 टक्के मतदान प्राप्त झाले. इतर पक्षाच्या तुलनेत शिवसेना पक्ष हाच नंबर एकचा ठरला. तर नप अध्यक्ष उमेदवार निवडून आल्यावरही उबाठा शिवसेना गट दुसèया क्रमांकावर राहिला. प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4 व 6, 7, 8, 9 या मध्यवस्तीतील प्रभागातील सर्व जाती-धर्म व पंथाच्या लोकांनी संजय राठोड यांच्या कार्याकडे पाहून शिवसेनेच्या संपूर्ण पॅनलला मतदान केले. पुढे आलेला मतदानाचा आकडा पाहता शिवसेनेचे हे यश आज कुणाहीपासून लपलेले नाही. 16 नगरसेवक मिळून निश्चितच शहराचा सार्वजनिक विकास करतील आणि संजय राठोड निश्चितच विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाहीत, अशी आशा दिग्रसकर नागरिकांना आहे.