डोल्हारी (देवी) ते खोपडी रस्त्याचे काम प्रगतीपथावर

-केंद्रप्रमुख विजय काळे यांनी घेतला पुढाकार -दै. तरुण भारत वृत्ताची दखल

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा,
vijay-kale : तालुक्यातील डोल्हारी (देवी) ते खोपडी रस्त्याची झालेली दुरावस्था दैनिक तरुण भारतने प्रकाशित करताच त्यांची दखल घेत संबंधित विभागाने कामाला सुरवात केली आहे. डोल्हारी (देवी) ते खोपडी या 4 किमी लांबीच्या रस्त्यात अनेक खड्डे निर्माण झाले होते. या रस्त्याने दररोज ये-जा करणाèया अनेक लोकांना मनस्ताप होत होता. अनेकांना शारिरीक व्याधी निर्माण झाल्या होत्या. वाहनांचेही वारंवार नुकसान होत होते. विद्यार्थ्यांना देखील या अडचणींचा त्रास सहन करावा लागत होता.
 
 
 
y29Dec-Dolhari-(1)
 
 
 
या संबंधात दैनिक तरुण भारतने ‘डोल्हारी रस्त्याची वाईट स्थिती’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. यासंदर्भात विजय काळे, भगवान जाधव, अमोल रूणवाल, ज्ञानेश्वर आडे व गावातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग दारव्हा येथील उपअभियंत्यांना निवेदन दिले. यावेळी लवकरच रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. विजय काळे (केंद्रप्रमुख शिक्षण विभाग) तथा संकल्प क्रीडामंडळाचे सचीव यांनी गावकèयांना सोबत घेऊन या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला. त्यामुळे 18 डिसेंबरपासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.
 
 
डोल्हारी (देवी) ते खोपडी दरम्यानच्या 4 किमी लांबीच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून या रस्त्याचे काम होताना पाहून गावकèयांनी समाधान व्यक्त केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करावे, अशी आशा गावकèयांनी व्यक्त केली आहे.