कारंजा (घा.),
hanuman-temple : नववार्षानिमित्त संकटमोचक हनुमानाला वंदन करून आपल्या वर्षभराच्या दैनंदिन कामकाजाला सुरूवात करण्याची येथील नागरिकांची परंपरा आहे. नववर्षातील पहिल्या शनिवारी गावाच्या वेशीवर असलेल्या पुरातन हनुमान मंदिरात लोकसहभागातून धार्मिक उत्सव साजरा करण्यात येतो. शहर व परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी असते. खर्डीपुरा येथील गावाबाहेरील हनुमान मंदिरात नववर्षानिमित्त धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन २ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. रात्री श्री गुरुदेव संस्कृती भजन मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम होईल. ३ रोजी पहाटे हनुमानाला अभिषेक होईल त्यानंतर काल्याचे कीर्तन तसेच लटारे महाराज बँड पार्टी यांची रामधून व संगीतमय सुंदरकांड पाठ व सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.