नवी दिल्ली,
india-worlds-fourth-largest-economy भारताच्या विकासप्रवासात २०२५ हे वर्ष निर्णायक ठरले आहे. या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळाले, रोजगारस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली, महागाईचा दबाव कमी झाला आणि निर्यातीला स्थैर्य लाभले. या सकारात्मक घडामोडींमुळे भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवले आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात ८.२ टक्के वाढ नोंदवण्यात आली. ही वाढ प्रामुख्याने मजबूत देशांतर्गत मागणीमुळे शक्य झाली. नोव्हेंबर २०२५ मध्ये बेरोजगारीचा दर घटून ४.७ टक्क्यांवर आला. विशेषतः महिलांच्या बेरोजगारीत झालेली मोठी घट यामागील महत्त्वाची कारणे ठरली. याच काळात व्यापार आणि निर्यात क्षेत्रातही सकारात्मक वातावरण दिसून आले. india-worlds-fourth-largest-economy नोव्हेंबर २०२५ मध्ये भारताची निर्यात ३८ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली, जी जानेवारी महिन्यात सुमारे ३६ अब्ज डॉलर्स इतकी होती. २०२५ दरम्यान ब्रिटन, ओमान आणि न्यूझीलंड यांसारख्या देशांशी व्यापार भागीदारी अधिक मजबूत करण्यात आली. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताची उपस्थिती वाढली असून नव्या आणि उदयोन्मुख बाजारांपर्यंत पोहोच सुलभ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणारा सातत्यपूर्ण विश्वास, भक्कम देशांतर्गत मागणी, घटती बेरोजगारी आणि नियंत्रणात येत असलेली महागाई यामुळे भारत २०४७ पर्यंतच्या विकास उद्दिष्टांच्या दिशेने स्थिर आणि भक्कम वाटचाल करण्याच्या स्थितीत पोहोचला आहे.
२०२५ मध्ये देशाच्या सुधारणांबद्दलच्या एका सरकारी प्रकाशनात म्हटले आहे - "४.१८ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या सकल देशांतर्गत उत्पादनासह (जीडीपी) भारताने जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि पुढील २.५ ते ३ वर्षांत जर्मनीला तिसऱ्या स्थानावरून मागे टाकून २०३० पर्यंत ७.३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या अंदाजे जीडीपीसह ते स्थान मिळवण्यास सज्ज आहे."
जगातील ५ सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था
अमेरिका
चीन
जर्मनी
भारत
जपान