कर्मण्नेय स्कूलमध्ये ‘के.एस.ई. मॅरेथॉन’ उत्साहात संपन्न

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Karmannay School कर्मण्नेय स्कूल ऑफ एक्सिलेन्स, बुटीबोरी येथे नागपूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित ‘के.एस.ई. मॅरेथॉन’ ही प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. हा उपक्रम श्री साईकृपा किसान एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा प्रतिभा घाटे तसेच कर्मण्नेय स्कूल ऑफ एक्सिलेन्सच्या संचालिका प्रीती एस. कानेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबविण्यात आला.स्पर्धेचे उद्घाटन संकल्प घाटे (सचिव, एस.एस.के.ई.), डॉ. उन्नती दातार (प्राचार्या, के.एस.ई.) व . युवराज एन. घाटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या प्रसंगी क्रीडावृत्ती, उत्साह व उत्कृष्टतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

30 
 
 
 
या मॅरेथॉनमध्ये ओपन, १८ वर्षांखालील, १४ वर्षांखालील व ८ वर्षांखालील अशा विविध वयोगटांत मुला-मुलींच्या स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत ५०० पेक्षा अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सहनशक्ती, जिद्द व क्रीडास्पिरीटचे उत्कृष्ट दर्शन घडवले. Karmannay School स्पर्धेतील सर्व विजेत्यांना प्रमाणपत्रे, पदके व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे युवकांमध्ये क्रीडावृत्ती, शिस्त, चिकाटी व शारीरिक तंदुरुस्ती यांचा विकास होण्यास चालना मिळाल्याचे आयोजकांनी नमूद केले.या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या वतीने नितीन ढाबेकर तसेच संपूर्ण के.एस.ई. टीमचे उत्कृष्ट नियोजन व परिश्रमाबद्दल विशेष आभार मानण्यात आले.
 
सौजन्य: डॉ. उन्नती दातार,संपर्क मित्र