कोरची-कुरखेडा रस्त्यावरील घाटावर अपघाताची मालिका सुरूच

(मालवाहू ट्रक रिव्हर्स आल्याने एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी)

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
कोरची, 
accident : कुरखेडा मार्गे छत्तीसगडला लोखंडी साहित्य घेऊन जाणारा ट्रक (क्र. सी.जी. 07 बी. ई. 5718) वळणी घाटावर अनियंत्रित होऊन रिव्हर्स आल्यामुळे साधारणतः 50 मीटर दुरीवर असलेल्या दोन दुचाकी या ट्रक खाली दबल्या गेल्या. प्रचंड वेगाने ट्रक रिव्हर्स येत असल्याचे निदर्शनास येतात दोन्ही दुचाकी स्वारांनी उडी घेतली. परंतु दोन्ही दुचाकीमध्ये असलेल्या चार लोकांपैकी एक सुखरूप बाहेर पडाला परंतु तिघांना गंभीर दुखापत झाली. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
 
 
 
acc
 
 
 
तालुका मुख्यालयापासून 8 किलोमीटर अंतरावर 6 किलोमीटरचे मोठे वळणी घाट असून मागील काही दिवसांपासून सदर घाट हे अपघाताचे माहेरघर झाल्याचे दिसून येत आहे. सकीर्ण रस्ता व वळणी घाट आणि त्यातच जड वाहनांची सतत ये-जा यामुळे या मार्गावर सतत अपघाताची मालिका सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अपघातामुळे कित्येकदा सदर मार्ग मार्गक्रमणासाठी बंद असतात, ज्यामुळे याचा फटका छोटे वाहन चालक तसेच रुग्णवाहिका सारखे आपातकालीन सेवा देणार्‍यांना बसत असल्याचे बहुतेकदा दिसून आले आहे.
 
 
यामध्ये एम. एच. 33 ई. 6350 क्रमांकाच्या दुचाकीने कोरची मार्गे जाणार्‍या दोन्ही जखमींना खाजगी वाहनाच्या सहाय्याने तातडीने पुराडा येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले तर सी. जी. 04 के. एफ़. 1854 क्रमांकाच्या दुचाकीने कोरचीकडे जाणार्‍या मोहगाव येथील दया फुलकुवर (35) याला 108 रुग्णवाहिकेच्या सहाय्याने ग्रामीण रुग्णालय कोरची येथे भरती करण्यात आले. परंतु प्रकृती बिघडत असताना त्याला पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सुरूच ठेवून घटनास्थळावरून पसार झाला. पुढील तपास पुराडा पोलिस करत आहेत.