दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुक्यामुळेअनेक उड्डाणे रद्द

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Many flights were cancelled due to fog देशभरात सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडीत दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुक्यामुळे लोकांच्या प्रवासाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारी सकाळपासूनच धुक्यामुळे हवाई वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर, ६० आगमन, ५८ प्रस्थान आणि १६ उड्डाणांना वेगळ्या मार्गावर वळवले गेले. विमानतळाने सकाळी ७ वाजता प्रवाशांसाठी अधिकृत सूचना जारी केली. यात म्हटले आहे की, सुरुवातीला शहर दाट धुक्याने वेढले होते, त्यामुळे दृश्यता कमी झाली होती, परंतु नंतर दृश्यमानता सुधारल्याने विमान वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. सर्व टर्मिनल्सवर ऑन-ग्राउंड अधिकारी उपस्थित असून प्रवाशांना आवश्यक मदत पुरवली जात आहे, असे विमानतळाने आश्वासन दिले.
 
 

delhi pollution flight delay 
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, उत्तर भारतातील काही भागात धुके आणि कमी दृश्यता असल्यामुळे हवाई वाहतूकावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रवाशांना सूचित केले गेले आहे की त्यांनी उड्डाण स्थिती आगाऊ तपासावी, एअरलाइन्सशी संपर्क साधावा आणि प्रवासासाठी पुरेसा वेळ ठेवावा. विमान कंपन्या ना प्रवाशांच्या सोयीसाठी कठोर निर्देश देण्यात आले आहेत. यात वेळेवर उड्डाण माहिती देणे, उशिरा येणाऱ्या प्रवाशांसाठी जेवणाची सोय, रद्द झालेल्या उड्डाणांची पुन्हा बुकिंग किंवा परतफेड, वेळेवर चेक-इन केलेल्या प्रवाशांना बोर्डिंगपासून वंचित न ठेवणे, सामानाची योग्य सोय आणि त्वरित तक्रारींचे निराकरण करणे यांचा समावेश आहे. यापूर्वी दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतूकही प्रभावित झाली होती. यामुळे अनेक गाड्या उशिरा पोहोचल्या. विमानतळासमोरील परिस्थितीवर मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.