मुलाचा मृतदेह बघतच आईने साेडला प्राण!

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |

death
 
नागपूर, 
Mother lost her life with her child मुलाचा मृत्यू झाल्यानंतर घरात ठेवलेला मृतदेह बघता-बघता आईनेही जीव साेडला. ही दुर्दैवी घटना कामठीतील भीमनगरात घडली. या घटनेमुळे भावनिक वातावरण झाले हाेते. रेवा पुसाराम शेलारे आणि लिलाबाई शेलारे अशी मृत मायलेकांची नावे आहेत. मायलेकाचे नाते खूप भावनिक असते. मुलगा कितीही माेठा झाला तरी आईसाठी ताे लहानच असताे. आपले दु:ख वेदना बाजूला सारून मुलाला आनंदी ठेवण्याचे स्वप्न उराशी आई ठेवते. भीमनगर येथील रहिवासी शेलारे कुटुंबातील अंदाजे 65 वर्षाचा मुलगा रेवा पुसाराम शेलारे यांचे सायंकाळी साडे सात वाजता अकस्मात निधन झाले. त्याच घरात राहणाèया 85 वर्षाच्या लिलाबाई पुसाराम शेलारे यांनी मुलाच्या मृतदेहाकडे पाहत रात्री दीड वाजता शेवटचा श्वास घेतला. काल दाेन्ही मायलेकांच्या अंत्ययात्रेदरम्यान वातावरण भावनिक झाले हाेते. दाेन्ही मायलेकाच्या मृतदेहाला बहिणींनी मुखाग्नी दिली.