प्रवाशांना लुटणाऱ्या ऑटाेचालकांच्या टाेळीला अटक

- उत्तरप्रदेश-दिल्लीतून आणले आराेपी: 16.75 लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
auto-drivers-robbing-passengers : मध्यवर्ती बसस्थानकावर ऑटाे उभे करुन प्रवाशांना आटाेत बसल्यानंतर हातचलाखी दाखवून प्रवाशांचे दागिने आणि पैसे लुटणाèया टाेळीचा छडा गणेशपेठ पाेलिसांनी लावला आहे. या टाेळीला उत्तरप्रदेश, दिल्लीतून अटक केली असून त्यांच्याकडून साेन्याच्या दागिन्यांसह 16 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टाेळीने चाेरलेल्या मुद्देमालांमध्ये 40 ताेळे साेन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. सावज हेरत सराईतपणे चाेरी करणाèया या टाेळीत परराज्यातील आणखी दाेन सराईत चाेरांचा समावेश आहे.
 
 
 
GANESHPETH-POLICE
 
 
 
चाेरीच्या एका प्रकरणात गणेशपेठ पाेलिसांनी शंभराहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातला एक जण गणेशपेठ पाेलिसांच्या पथकाला बसस्थानक परिसरात घुटमळताना दिसला. त्याला ताब्यात घेत चाैकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून पाेलिसांना या टाेळीचा उलगडा झाला. सहाय्यक फौजदार समिर शेख, पवन मालखेडे यांनी बिजनाैर आणि दिल्ली शहरातून आराेपींचा सुगावा लावला. प्रवाशांना लुटणाèया या टाेळीने आतापर्यंत गणेशपेठ हद्दीतील दाेन, पाचपावली आणि नंदनवन येथून एक अशा चार जणांना लुटल्याचे तपासातून समाेर आले. या टाेळीची माेडस बघता या टाेळीने काेटींपेक्षा जास्त रकमेचे साेने लुटल्याची शक्यता आहे.
 
 
 
गणेशपेठ पाेलिस ठाण्याच्या गुन्हे शाेध पथकाचे पाेलिस निरीक्षक पांडूरंग जाधव, विजेंद्र नाचण, सहाय्यक फौजदार समिर शेख यांच्या पथकाला टाेळीची माहिती मिळाली. इम्रान उफर् साेनू एजाज खान (41), रा लाेधीपूरा, जुना जेलखाना, शाहदद खान हबीब खान (28) रा. गाैसिया काॅलनी, अब्दुल नदीन नईम शेख (28), रा. बाराखाेली, आसीम अहमद जमीर अहमद (42) आणि रविंद्रकुमार उफर् दालू भूरे सिंग (50) दाेघेही रा. मकसूद तनपूर, जि. बिजनाैर अशी गणेशपेठ पाेलिसांनी अटक केलेल्या ऑटाे लूट टाेळीतील सदस्यांची नावे आहेत. यातला इम्रान, शाहदद आणि अब्दुल हे तिघेही ऑटाेचालक आहेत. तर बिजनाैरचे दाेघे सराईत चाेर आहेत. या टाेळीतले आणखी सराईत चाेर बिजनाैर आणि दिल्लीतील असून पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत.
 
असे करायचे लुबाडणूक
 
 
बसस्थानकावरुन प्रवाशाला एक जण ऑटाेत बसवायचा. काही अंतरावर ऑटाे बंद पडल्याचे सांगून दुसèया साथिदाराच्या ऑटाेत प्रवाशाला बसवून द्यायचे. त्या ऑटाेत प्रवाशी म्हणून अन्य साथिदार बसायचे. त्यानंतर प्रवाशाच्या नजरेसमाेरच त्याच्या बॅगमधील दागिने चाेरी करायचे. आतापर्यंत त्यांनी 16 लाखांचे साेन्याचे दागिने चाेरी केल्याचे समाेर आले. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येऊ शकतात.