नागपूर,
revenue-from-freight-transport : मध्य नागपूर विभागाने अन्नधान्य, साखर, सिमेंट, लोहा, कोळसा आदींच्या मालवाहतुकीतून कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. याशिवाय नागपूर विभागाने ’बटाटा उत्पादकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न’ चालविले असून त्यास यश मिळाले आहे. हिरदागड जंक्शनवरून ४२ बीसीएनची एक रेक सांकराईल (हावडा) गुइस शेडकडे रवाना झाली. १२९८ किलोमीटर अंतरावर ही पहिली खेप पोहचली आणि मध्य रेल्वेला एकाच खेपमधून २८ लाखांचे भाडे मिळाले आहे.
रेल्वे प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्रातील विविध प्रकारच्या उत्पादनावर नजर रोखली आहे. यातून मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात येणार्या हिरदागड रेल्वे स्थानकाच्या आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात बटाट्याचे उत्पादन होत असल्याने या बटाट्याला पश्चिम बंगालसह पूर्वेकडील राज्यात मागणी वाढली आहे. अन्य वाहनांनी बटाटा रवाना जात असल्याने खर्च अधिक येतो, तर रेल्वेच्या माध्यमातून कमी खर्च येतो.
मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे बटाटे रेल्वेकडे पाठ फिरवून वेगवेगळ्या वाहनांनी वेगवेगळ्या प्रांतात जात होते. यंदा मात्र रेल्वे प्रशासनाने कसोशीने प्रयत्न केल्याने बटाटा उत्पादक रेल्वेतून माल वाहतूक करण्यास राजी झाले. यावर्षी बटाट्याची केवळ एकच रेक रेल्वेने रवाना झाली. मात्र, पुढच्या ८ ते १० रेक बटाटा मालवाहतूक करण्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने निश्चित केले आहे. सोबतच मालवाहतूक उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्यास तसेच कृषी मालाच्या वाहतुकीत रेल्वेचा वाटा अधिक मोठा करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.