सहापैकी ४ घाटांतून घरकुल लाभार्थ्यांना वाळू पुरवठा

*हिंगणघाट तालुक्यातील स्थिती * २ घाटात अजूनही पाणी

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
sand-supply : आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांचे पया घराचे स्वप्न पूर्ण व्हावे या उद्देशाने घरकुल योजना सुरू करण्यात आली. पण, वाळू उपलब्ध होत नसल्याने घरकुलची कामे थांबली होती. अशातच शासनाच्या आदेशाने हिंगणघाटचे तहसीलदार योगेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीकांत शेळके यांच्या मार्गदर्शनात तालुयातील ६ वाळूघाट घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यावर शिकामोर्तब केला. सध्या ४ वाळू घाटांमधून लाभार्थ्यांना वाळू वितरित केली जात असून दोन घाटांमध्ये अजूनही पाणी असल्याने तेथून वाळू वितरण सुरू झालेले नाही.
 
 
jk
 
 
हिंगणघाट तालुयातील कापसी सर्वे ११, ८१, १२, १११ तर सर्वे क्रमांक २३, २४ तसेच जुनोना सर्वे क्रमांक २९, ३२, ३३, ३६, ४० यासह पोहणा सर्वे क्रमांक २१, २२ तर धानोरा सर्वे क्रमांक १८४, १८५ आणि काजळसरा येथील सर्वे क्रमांक २, ७०, २७, ३२, ७४, २६९ येथून सुमारे २३०० ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांना वितरित करण्याचे तालुका प्रशासनाने निश्चित करण्यात आले आहे. जुनोना व काजळसरा वगळता उर्वरित ४ वाळू घाटांमधून सध्या घरकुल लाभार्थ्यांना हिंगणघाट तालुका प्रशासनाच्या वतीने वाळू वितरित करण्यास सुरूवात झाली आहे. ज्या एजन्सींनी वाळू घाटांचा लिलाव घेतला त्यांच्याकडून वाळूचा उपसा सुरू करण्यात आला नसला तरी तालुका प्रशासनाने शासनाच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत वाळू वितरण सुरू करण्यास सुरूवात केली आहे. घरकुल मंजुरीचे कागद व आधार कार्ड आणा आणि वाळू न्या, असे धोरण सध्या राबविले जात आहे. त्याकरिता प्रत्येक घाटावर तलाठ्यांची नियुतीही करण्यात आली आहे. शिवाय पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडून घरकुलच्या लाभार्थ्यांची यादीही मागविण्यात आली आहे. घरकुलच्या लाभार्थ्यांनी घरकुल मंजुरीचे कागद व आधार कार्ड सोबत नेऊन वाळू घाटावर गेल्यास त्यांना रितसर वाळू दिली जात आहे.
 
 
तालुयातील सहा वाळू घाट घरकुलच्या लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यापैकी चार घाटांवरून सध्या लाभार्थ्यांना वाळू वितरित केली जात आहे. दोन घाटांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तेथून वाळू वितरण सुरू झालेले नाही. लाभार्थ्यांनी घरकुल मंजुरीचा कागद व आधार कार्ड सोबत आणून रितसर वाळू घेऊन जावी, असे आवाहन हिंगणघाटचे तहसीलदार योगेश शिंदे यांनी केले आहे.