तभा वृत्तसेवा
उमरखेड,
state-level-karate-competition : हिंगोली येथे पार पडलेल्या 8 व्या महाराष्ट्र राज्यस्तर कराटे स्पर्धा 2025 मध्ये स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मिडीयम स्कूल, दहागाव येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर टाकली आहे. या स्पर्धेत ईश्वरी अविनाश जाधव हिने 11 वर्ष वयोगटात कराटे फाईट प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत विशेष प्रावीण्यासह सुवर्णपदक मिळवले. श्रीनय शशिकांत आकरे याने 10 वर्ष वयोगटात कराटे फाईट प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत विशेष प्रावीण्यासह सुवर्णपदक प्राप्त केले.

याच स्पर्धेत गायत्री शशिकांत आकरे हिने केवळ 8 वर्ष वयोगटात कराटे फाईट प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत विशेष प्रावीण्यासह सुवर्णपदक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष दर्शन अग्रवाल, उपाध्यक्ष नारायण वड्डे, सचिव नितीन भुतडा, सपना अग्रवाल, संस्थेचे व्यवस्थापक आशिष लासीनकर, मुख्याध्यापक एमपी कदम व मुख्याध्यापक पल्लवी पराते यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. या यशामुळे शाळेच्या क्रीडा परंपरेला नवी दिशा मिळाली असून भविष्यात हे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.