शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध : आ. सुधाकर अडबाले

(विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे गडचिरोली जिल्हा अधिवेशन)

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
गडचिरोली, 
sudhakar-adbale : शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केले. ते आरमोरी येथे आयोजित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अधिवेशनात उद्घाटक म्हणून बोलत होते.
 

jkl 
 
या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ मुंबईचे सरचिटणीस माजी आमदार विश्‍वनाथ डायगव्हाणे होते. विशेष अतिथी म्हणून आमदार रामदास मसराम तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संस्थाचालक संघटनेचे सचिव जयंत येलमुले, श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, हितकारणी शिक्षण संस्थेचे सचिव तेजराव बोरकर, विद्यानिकेतन शिक्षण संस्थेचे सचिव योगेश कापकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे सहकार्यवाह जगदीश जुनगरी, श्रीराम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मी मने, माजी कोषाध्यक्ष शेमदेव चापले, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकुंद मशाखेत्री, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, अहेरी प्रकल्प आदिवासी आश्रम शाळा कर्मचारी संघटनाप्रमुख यादव धानोरकर, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर कवाडकर, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप अर्जुनकर उपस्थित होते.
 
 
 
या अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करणे, 10-20-30 योजना माध्यमिक शाळेतील शिक्षकांना लागू करणे, टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायाच्या निर्णयाबद्दल शासनाशी पाठपुरावा करणे, निवड श्रेणी विनाअट लागू करणे, यासह आश्रम शाळा शिक्षकांच्या समस्या, अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या समस्या, तसेच विधान परिषदेच्या माध्यमाने शासनाशी केलेला पाठपुरावा याविषयी आमदार सुधाकर अडबाले यांनी मार्गदर्शन केले. अधिवेशना दरम्यान जयंत येलमुले यांनी संस्थाचालकांच्या समस्या, मुरलीधर कवाडकर यांनी अंशतः अनुदानित शाळांच्या समस्या, यादव धानोरकर यांनी आश्रमशाळांतील समस्या व संदिप अर्जुनकर यांनी अनुदानित उच्च माध्यमिक शाळांतील समस्या मांडल्या. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा गडचिरोलीच्या या वर्षीच्या कार्याचा अहवाल जिल्हा कार्यवाह अजय लोंढे यांनी मांडला. या अधिवेशनात दिलीप गडपल्लीवार आणि पुरुषोत्तम उरकुडे यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ मुंबई च्या सदस्यपदी एकमताने निवड करण्यात आली. अधिवेशनाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष रविंद्र नैताम यांनी केले. संचालन दिनेश वनमाळी व दिलीप नैताम यांनी तर आभार जयकुमार शेंडे यांनी मानले.