अट्टल दुचाकी चोरास 24 तासांत अटक

आर्णी पोलिसांची कारवाई

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी,
two-wheeler-thief : अट्टल दुचाकी चोरास पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे. सचिन सुकळकर उर्फ आकाश (वय 32, लाखरायाजी, ता. दिग्रस) असे ताब्यात घेतलेल्या चोराचे नाव आहे. त्याचेकडून गुन्ह्यातील त्याने चोरलेली एमएच29 एआय8257 किंमत असा 30 हजार रुपयाची जप्त करण्यात आला आहे.
 
 
 
संग्रहित फोटो
 
 
 
आर्णी पोलिस ठाण्यात शनिवार, 27 डिसेंबर तक्रारदार संदीप उत्तम चव्हाण (वडगाव ता. दिग्रस) यांची हिरो स्प्लेंडर प्लस चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरुन तपास केला असता आरोपी सचिन संदीप सुकळकर उर्फ आकाश याने चोरी केल्याचे समोर आले. त्याच्या ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील त्याने चोरलेला 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
 
 
 
आरोपीकडे अधिक विचारपूस केली असता त्याने यापूर्वी पोलिस ठाणे यवतमाळ शहर येथील दुचाकी व पोलिस ठाणे घाटंजी येथील एक दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याने एक हिरोस्प्लेंडर प्लस, एक हिरोहोन्डा सिडी डिलक्स, एक बजाज बॉक्सर, एक हिरोहोन्डा स्प्लेंडर, एक हिरो सुपर स्प्लेंडर अशा एकूण सहा दुचाकी एकूण किंमत 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.