विघ्नहर्ता परिवाराने नायलॉन मांजाविरोधात घेतली शपथ

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
vighnaharta-parivar : पशू-पक्ष्यांसह मानवी जिवांना घातक असलेल्या नायलॉन मांजाविरुद्ध विघ्नहर्ता योगनृत्य परिवाराकडून विशेष मोही राबविण्यात येत आहे. त्यासाठी विघ्नहर्ताच्या सदस्यांनी नायलॉन मांजाचा वापर न करण्याबाबत आणि विक्रीला प्रतिबंध घालण्याबाबत शपथ घेतली आहे.
 

ngp 
 
 
 
दत्तात्रयनगरातील सार्वजनिक संत ज्ञानेश्वरनगर उद्यानात विघ्नहर्ता योगनृत्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक डॉ. बबनराव गांजरे यांच्या नेतृत्वात जवळपास 300 सदस्य गोळा झाले. त्यांनी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ घेतली. तसेच कुणी नायलॉन मांजा वापरत असेल तर त्यांना विरोध करुन पोलिस आणि मनपाच्या पथकाला माहिती देण्याचे आव्हान करण्यात आले. यावेळी मुख्य प्रशिक्षक डॉ. गांजरे यांनी शपथेचे वाचन केले. नायलॉन मांजामुळे पशू-पक्षी यांच्यासह मानवी जीवांना धोका निर्माण झाला आहे.
 
 
गेल्या काही वर्षांत नायलॉन मांजामुळे काहींना जीव गमवावा लागला आहे तर नायलॉन मांजा दुचाकी वाहनांना अडकल्यामुळे अपघातास कारणीभूत ठरला आहे. नागपूर पोलिस आयुक्त आणि मनपा आयुक्तांच्या नायलॉन मांजाविरोधी विशेष मोहिमेत विघ्नहर्ता परिवार सहभागी झाला आहे. नायलॉन मांजा विक्री आणि वापरणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवून आयुक्तांना पाठींबा दर्शविला आहे. यावेळी सदस्य महादेव तोंडरे, राजू कोठाळे, लक्ष्मण बालपांडे, अॅड. कांबळे, नत्थूजी ढोबळे, दीपक तऱ्हेकर हिम्मतराव आगाशे, आरेकर गुरुजी, देशमुख, साहूरकर, कॅप्टन पराते, जय रामटेके व महिला सदस्य उपस्थित होते.