वर्धा,
jungle-safari-bor-project : जैवविविधतेने नटलेल्या आणि पट्टेदार वाघाच्या संवर्धनासाठी उपयुत ठरत असलेला बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. या व्याघ्र प्रकल्पाला यंदा ३ हजार २५ पर्यटकांनी भेट देत जंगल सफारीचा आनंद लुटला. या सफारीतून बोर व्याघ्र प्रकल्पाला १३.५७ लाखांचा महसूल मिळाला आहे.

१३ हजार ८०० हेटर कोअर तर ६७ हजार ८१४.४६ हेटर बफर क्षेत्र असलेल्या सेलू तालुयातील बोर व्याघ्र प्रकल्पात सन २०२३ ते २०२५ या काळात विशेष सर्वेक्षणाअंति तब्बल १३१ प्रजातींच्या आरोही वनस्पती असल्याची नोंद घेण्यात आली आहे. या व्याघ्र प्रकल्पात सुमारे १८ वाघांसह बिबट, अस्वल असे तृण व मांस भक्षी वन्यप्राण्यांची संख्याही मोठी आहे. या व्याघ्र प्रकल्पाची महाराणी बीटीआर-१ अंबिका, बीटीआर-३ कॅटरिना, बीटीआर-७ पिंकी, बीटीआर-८ युवराज या पट्टेदार वाघांची एक झलक बघण्यासाठी पर्यटक येतात. यंदा १ ऑटोबरला बोर व्याघ्र प्रकल्पाचे गेट जंगल सफारीसाठी पर्यटकांकरिता खुले करण्यात आले. तर अडेगाव येथील गेट काही तांत्रिक अडचणींमुळे २७ डिसेंबरपासून खुले करण्यात आले आहे. १ ऑटोबर २०२५ ते २९ डिसेंबर २०२५ या काळात बोर व्याघ्र प्रकल्पाला ३ हजार २५ पर्यटकांनी भेटी देत जंगल सफारीचा आनंद लुटला. यात ऑफलाईन नोंदणी करून जंगल सफारी करणार्या २ हजार ८८ पर्यटकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
३१ डिसेंबरची बुकींग फुल्ल
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीसाठी राज्यातील आणि राज्याबाहेरील पर्यटक बोर व्याघ्र प्रकल्पाला भेटी देतात. प्रत्येक गुरुवारी बोरची जंगल सफारी बंद राहते. सरत्या वर्षाच्या अखेरचा दिवस असलेल्या ३१ डिसेंबरला बोरच्या जंगल सफारीसाठीची बुकींग पूर्वीच फुल्ल झाली आहे. अडेगाव येथून दररोज ८ तर बोरधरण येथून १५ जिप्सी पर्यटकांच्या जंगल सफारीसाठी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने सोडल्या जातात.