नप निवडणुकीत ‘सहकारीं’ना नकार!

*फक्त दोघांना पसंती

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
सिंदी (रेल्वे), 
municipal-council-election : नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहराच्या विविध सहकारी संस्थांमध्ये कार्यरत अधिकारी व पदाधिकार्‍यांना जनतेने नाकारल्याचे दिसून येत आहे. शहरातील सहकार क्षेत्रातील ९ मान्यवरांपैकी फत दोघे विजयी झाले आहेत.
स्थानिक नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सहा महिला रिंगणात होत्या. त्यात विविध विशाल कार्यकारी संस्थेचे माजी अध्यक्षांच्या सौभाग्यवतींचा समावेश होता.
 
 
np
 
 
 
त्यांना पराभवाचा धका बसला. त्याच संस्थेचे संचालक धनराज झिलपे, प्रवीण सिर्सीकर, अजय कलोडे आदींनी नशीब आजमावले. त्यापैकी अजय कलोडे विजयी झाले. खरेदी-विक्री सह. संस्थेचे माजी सभापती आशिष देवतळे, संचालक प्रा. ए. सी. कलोडे आणि माजी संचालक अमोल सोनटके यांनी देखील नशीब अजमावले. त्यापैकी आशीष देवतळे अटितटीच्या संघर्षात यशस्वी झाले. समर्थ नागरी पतसंस्थेच्या संचालक मनीषा झिलपे आणि सिंदी शहर नागरी पतसंस्थेच्या लता उपरीकर यांनी देखील ही निवडणूक लढविली. परंतु, दोघींनाही मतदारांनी कौल दिला नाही. प्रवीण सिर्सीकर, आशिष देवतळे व ए. सी. कलोडे तिसर्‍यांदा निवडणुकीत सहभागी झाले होते, हे विशेष!