वर्धा,
pankaj-bhoyar : वर्धेकरांनी आपल्यावर प्रचंड विश्वास टाकला आहे. त्यांना दिलेल्या शब्दांची पूर्तता होत आहे. सिंचना, युवकांच्या रोजगाराचा असो अथवा सर्वसामान्यांचे आरोग्य, नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न असो यासाठी शासन दरबारी प्रश्न निकाली निघाले. जिल्हा आता विकासाचे मॉडेल बनेल असा विश्वास व्यत करीत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी २०२५ या सरत्या वर्षाचा मागोवा घेत नवीन संकल्प व्यत केले.
आपल्या एक वर्षाच्या मंत्रिपदाच्या कालावधीत जिल्ह्यातील प्रशासकीय इमारती, सिंचन प्रकल्प, पर्यटन, आरोग्य,व नागरी सुविधांसाठी कोट्यवधींचा निधी व जागा मंजूर करीत वर्धेकरांना मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. ते मार्गी लावण्यात यश आले. नगर विकास व इतर विभागांनी २३ डिसेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करून वर्धेतील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक, आरोग्य, पर्यटन, औद्योगिक, कृषी क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे.
रामनगर येथील शेत सर्वे क्र. १०४, ११० व ११४ मधील भूखंडधारकांनी त्यांनी जमीन फ्री होल्ड करण्याची मागणी केली होती. जमीन फ्री होल्ड करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रामनगरातील शेकडो भूखंडधारकांचे भूखंड मालकी हक्काचे होण्यासोबतच त्यांना खरेदी विक्रीचे व्यवहार व कर्ज करण्यास सोईस्कर होणार आहे. रामनगर पोलिस स्टेशनचे कामकाज नपच्या जागेवरून सुरू होते. पालकमंत्री भोयर यांच्या पुढाकारामुळे रामनगर पोलिस स्टेशनकरिता भूखंड हस्तांतरणास मान्यता मिळाली आहे. शहरालगत ११ ग्रापं क्षेत्रात घनकचर्याचे व्यवस्थापन करण्यासाठी इंझापूर येथे चार एकर जागा जिपला हस्तांतरीत करण्यात आली आहे.
टाटा टेनॉलॉजीचे जागतिक दर्जाचे सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन,, इन्युबेशन अँड ट्रेनिंग केंद्र (सीआयआयआयटी) सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुत विद्यापीठाचे विदर्भासाठीचे कार्यालय आता वर्धेत होणार आहे. जिल्ह्यातील बोर व धाम या दोन्ही प्रकल्पांच्या नुतनीकरणाची गरज निर्माण झाली होती. दोन्ही प्रकल्पांच्या नुतनीकरणासाठी ४२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
वर्धा येथील जिल्हा रुग्णालयात ५० खाटांचे नवीन क्रीटीकल केअर ब्लॉक आणि लेव्हल २ चे नवजात बालकांसाठी सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रथमच कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन आधि डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू करण्यात आले आहे. १५ मंदिरांना क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला. एकूण ६५ तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १६.४५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. स्मशानभूमी शेडची निर्मिती, सुसज्ज ग्रापं भवन, अंगणवाडीसाठी इमारत, अंगवाड्यांचे डिजीटायलेझेशन करण्यात आले आहे. जिल्ह्यात दफनभूमीचे २२० कामे करण्यात आली आहे.
त्यासाठी १४.२३ कोटी रुपये, ग्रापं भवन बांधकाम व सुसज्जीकणाचे ४१ कामे हाती घेण्यात आली. यासाठी ३.९६ कोटीची तरतूद करण्यात आली. भूमिगत गटार बांधकामाची ८० कामांसाठी ५.५८ कोटी, गावातील अंगर्तत रस्त्यांची ३५६ कामे मंजूर करण्यात आली. त्यासाठी २६.५६ कोटी रुपयांचे प्रावधान, २२ मोठया ग्रापंना आदर्श आपले सरकार केंद्र उभारण्यासाठी ४.४० कोटी, अंगणवाडी बांधकामासाठी १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले तसेच २०० अंगणवाडी स्मार्ट करण्यात आल्या असल्याचे ना. डॉ. पंकज भोयर यांनी आपल्या पालक मंत्रिपदाच्या एक वर्षातील विकास कामांचा मागोवा घेतला.