सर्वांगीण विकासासाठी कटीबद्द : आ. डॉ. मिलींद नरोटे

    दिनांक :31-Dec-2025
Total Views |
गडचिरोली,
Milind Narote : झाडीपट्टीची ही समृद्ध कला जोपासतानाच परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन आमदार डॉ. मिलींद नरोटे यांनी केले. तालुक्यातील कुर्‍हाडी येथे आयोजित ‘संगीत तूच माझी सौभाग्यवती’ या नाट्य प्रयोगाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
 

KL 
 
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती भाजपा तालुकाध्यक्ष दत्तूजी सूत्रपवार, भाजपा तालुकाध्यक्ष दत्तूजी सूत्रपवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते रत्नदीप पाटील म्हशाखेत्री, दैनिक तरुण भारतचे सुनील कावळे, विलास खेवले, अनिल तिडके, चेतन गोरे, सरपंच प्रशांत खोब्रागडे, पंकज चुधरी, सोमाजी पाटील, सोमनाथ मुनघाटे उपस्थित होते.
 
 
याप्रसंगी आमदार डॉ. नरोटे यांनी उपस्थित नागरिकांशीही प्रत्यक्ष संवाद साधत चुरचुरा गाव 100% धूरमुक्त करण्याचा टप्पा आम्ही यशस्वीपणे गाठला असून, आता गोगाव-महादवाडी-चुरचुरा या मार्गाचे काम देखील लवकरच मंजूर होऊन प्रत्यक्ष सुरू होत असल्याचे त्यांनी सांगीतले.
 
 
धार्मिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी पुंजामोती देवस्थानचा प्रस्ताव सरकारने मागवला असून लवकरात लवकर तो पाठवून या क्षेत्राचा कायापालट केला जाईल. तसेच, कुर्‍हाडी आणि महादवाडी येथील नागरिकांना दिलेल्या शब्दाप्रमाणे, येणार्‍या शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती स्थापन करून आपला संकल्प पूर्ण केला जाईल. विकास आणि संस्कृतीची ही सांगड अशीच कायम राखून आपण आपल्या भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते यावेळी म्हणाले.