हडस हायस्कूलमध्ये पर्यावरण जनजागृती कार्यक्रम

    दिनांक :31-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Hadas High School प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणाऱ्या पर्यावरणीय नुकसानीबाबत जनजागृती करण्यासाठी हडस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नागपूर येथे ३० डिसेंबर रोजी पर्यावरण विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, नागपूर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रांत सचिव डॉ. चारुदत्त चौधरी यांनी मार्गदर्शन केले. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर व “टॅग-ए-बॅग” उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले.
 

diva 
 
यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य डॉ. अजय चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.Hadas High School पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक वापर व्यवस्थापनाबाबत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. या कार्यक्रमात सुमारे ७० विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमास हडस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय आज चव्हाण, अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूरचे अध्यक्ष संजय साळवे, भरत विकार, उपाध्यक्ष राजेंद्र दिवारे, मधुकर पोते, सचिव प्रभाकर गजीनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
सौजन्य:राजेंद्र दिवारे,संपर्क मित्र