रस्ते, पूलांच्या कामांची आमदारांकडून पाहणी

कामांना गती देण्याचे दिले निर्देश

    दिनांक :31-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
kisan-wankhede : बंदी भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित रस्ते व पुलकामांमुळे नागरिकांना होणाèया गैरसोयीची दखल घेत आमदार किसन वानखेडे यांनी बंदी भागातील विविध रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या ठिकाणी वनविभाग परवानग्या तसेच कामांच्या गुणवत्ता व वेगावर सविस्तर चर्चा करून संबंधित विभागीय अधिकाèयांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले. याबाबत जिल्हाधिकाèयांशीही दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कामांना प्राधान्याने गती देण्याची विनंती करण्यात आली. नागरिकांच्या मुलभूत सुविधांच्या प्रश्नांवर तत्काळ उपाययोजना करण्याबाबत आमदारांनी स्पष्ट भूमिका मांडली.
 
 

y31Dec-Pahani 
 
 
 
यावेळी बिटरगाव-मोरचंडी रस्ता, बिटरगाव-मन्याळी-चिखली रस्ता, जेवली-एकंबा-मोरचंडी रस्ता, जेवली-सोनदाभी-बोरी रस्ता, बोरी-थेरडी-घाडी- खरबी रस्ता, दराटी-जवराळा रस्ता, जवराळा-मोरचंडी रस्ता, चिखली- मोरचंडी या रस्त्याची पाहणी केली. या भागातील नागरिकांना रस्त्यांमुळे भोगावा लागणारा त्रास दूर करण्यासाठी व विकासाच्या कामांना गती देण्यासाठी आमदार प्रयत्नशील असून, मंजुर कामे निविदा काढून कामाचे आदेश देण्यात आलेले रस्ते व पुलांची कामे तत्काळ सुरू करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
 
 
जनतेला उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात हा हेतू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बंदी भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी रोजगार, शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधा या क्षेत्रांवर काम केले जाईल, तसेच विधानभवनात बंदी भागासाठी विशेष पॅकेजची मागणी आधीच करण्यात आलेली आहे, अशी माहिती यावेळी आमदारांनी दिली.
 
 
यावेळी जिल्हा परिषद उपविभागीय अभियंता गुलाब येवंदे, सा. बां. विभाग उपविभागीय अभियंता अनिल राठोड, प्रभारी उपविभागीय अभियंता मयूर वंजारी, डीएफओ उत्तम फड, एसीएफ कोंडावार, आरएफओ धीरज मदने, आरएफओ रोडगे, कनिष्ठ अभियंता वसंत खासावत व अभियंता सुमित वंजारी उपस्थित होते.