शिक्षकाला लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकाला रंगेहात पकडले

    दिनांक :31-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
bribery-case : खैरखेडा येथील पदवीधर प्राथमिक शिक्षकाला त्यांच्याच शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने वैद्यकीय प्रतिपूर्तीकरिता दीड हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच घेताना मुख्याध्यापकाला 30 डिसेंबर रोजी सकाळी रंगेहात पकडले. लाच मागितल्याप्रकरणी 22 डिसेंबर रोजी शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली होती.
 
 
संग्रहित फोटो
 
 
मुख्याध्यापक गौरीशंकर प्रभाकर सौदाणे (वय 44) असे लाच घेणाèया मुख्याध्यापकाचे नाव आहे. शाळेतील पदवीधर शिक्षकाला अमरावतीच्या आदिवासी विभागातील अपर आयुक्तांकडून वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक रक्कम लवकरात लवकर खात्यात मिळावी याकरिता शाळेचे मुख्याध्यापक गौरीशंकर सौदाणे यांनी दीड हजार रुपये लाच मागितली होती. लाचेच्या मागणीच्या संदर्भात पडताळणी केली असता 30 डिसेंबर रोजी लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध खंडाळा पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
 
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वाशीम येथील पोलिस निरीक्षक अलका गायकवाड, यवतमाळचे पोलिस निरीक्षक मनोज ओरके, पोलिस योगेश खोटे, मंगेश देवकते, अतुल मत्ते, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, सचिन भोयर, आकाश सावसाकडे, भागवत पाटील, सूरज मेश्राम, अतुल नागमोते यांनी केली. मुख्याध्यापकाने शिक्षकाला लाच मागितल्याने खैरखेडा गावात एकच खळबळ उडाली आहे.