जयदीप हर्डीकर यांचा ३ जानेवारीला गौरव सोहळा

    दिनांक :31-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Senior journalist Jaydeep Hardikar विकासात्मक पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या उल्लेखनीय कार्याबद्दल रामोजी फाऊंडेशनचा पहिलाच प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले ज्येष्ठ पत्रकार व ग्रामीण-कृषी समुदायाच्या उन्नतीसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्ते जयदीप हर्डीकर यांचा सत्कार शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

pradhan 
 
 
हा गौरव सोहळा सायंकाळी ६ वाजता, पंचशील चौकातील टिळक पत्रकार भवनाच्या पत्रकार परिषद सभागृहात होणार असून जयदीप हर्डीकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.Senior journalist Jaydeep Hardikar राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात शेतकरी नेते विजय जावंघिया राहणार असून, प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे यावेळी भाष्य करतील.या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, विजय सातोकर आणि रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी केले आहे.
सौजन्य : देवराव प्रधान,संपर्क मित्र