हिंगणघाट,
suspected-tiger-carcass-found : येथून १० किमी अंतरावरील मानोरा - वैजापूर बीट परिसरातील कॅनलमध्ये आज बुधवार ३१ रोजी सकाळी वाघ मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे. हा वाघ दोन दिवसापूर्वी ताडोबाच्या जंगलातून या परिसरात आल्याची चर्चा आहे.
या परिसरातील एका शेतकर्याच्या शेतातील सुरक्षा भिंतीवरून विद्युत प्रवाह सुरू होता. याचा झटका बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यत करण्यात आला. ही बाब लक्षात येताच शेतकर्याने अंधाराचा फायदा घेऊन वाघाला तेथील जवळच्या नाल्यात टाकून दिले. वाघाचे अंदाजे वय ३ ते ४ वर्ष असून वाघ हा समुद्रपूर तालुयातून मुरपाड भागात आला असावा, असा अंदाज व्यत करण्यात येत आहे. सातेफळ येथील वन विभागाच्या नर्सरीमध्ये वाघाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार मराठे, ज्योती चव्हाण यांनी शवविच्छेदन केले.
सुमारे ३ ते ४ वर्ष वयोगटातील वाघाचा शेतातील कुंपनात विद्युत प्रवाहित करून शिकार करण्यात आली. या घटनेची माहिती कुणालाही होऊ नये तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत वाघ थेट पोथरा प्रकल्पाच्या कॅनलमध्ये फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकार्यांनी व्यत केला. प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक हरवीर सिंग, एसीएफ हरी सरोदे, वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी, आरओ मंजुषा रवाळे यांनी त्यांच्या सहकार्यांसह तातडीने घटनास्थळ गाठले. एनटीसीएचे प्रतिनिधी आशिष गोस्वामी, मुख्य वनसंरक्षकांचे (वन्यजीव) प्रतिनिधी कौस्तुभ गावंडे तसेच हिंगणघाट येथील पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या चमूला पाचारण करण्यात आले. वनाधिकारी व कर्मचार्यांनी स्थानिकांच्या मदतीने कॅनलमधून वाघाचा मृतदेह बाहेर काढला. वाघाचे सर्व अवयव शाबूत आहे की नाही याची शहानिशा केली. पंचनाम्याअंती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार मराठे, डॉ. अरुण तुराळे, डॉ. ज्योती चौहाण यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर वाघाचे अन्त्यसंकार करण्यात आले.