वर्धा,
Wardha News : भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, वर्धा जिल्हा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे, माजी खासदारद्वय रामदास तडस, सुरेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक विजयकर यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्या अनुमतीने आज ३१ डिसेंबर रोजी भाजपा जिल्हा कार्यालयात कार्यकारिणीची घोषणा केली.
या नव्या कार्यकारिणीत ३ जिल्हा सरचिटणीस, ८ जिल्हा उपाध्यक्ष, १० जिल्हा चिटणीस, १ कोषाध्यक्ष, १ युवा प्रमुख व १ युवती प्रमुख आणि ५० कार्यकर्त्यांना जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. मार्गदर्शक म्हणून १४ कायम निमंत्रित सदस्य व १० विशेष निमंत्रित सदस्य घेण्यात आले असून या ९९ सदस्यीय कार्यकारिणीमध्ये अनुसूचित जाती घटकाच्या विविध उपजातीतील सक्षम आणि अनुभवी कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा, जिप व पंस सर्कल मधील कार्यकर्त्यांची निवड केली आहे.
जिल्हा सरचिटणीस : प्रवीण डोंगरे वर्धा, मनोज वालदे पुलगाव, अतुल नंदागवळी हिंगणघाट, जिल्हा उपाध्यक्ष : राजेश अहिव आर्वी, ज्ञानेश्वर गोटे पुलगाव, नूतन राऊत वर्धा, धर्मा तेलमोरे देऊरवाडा, ईश्वर गाडगे धाडी, पवन सारसर आर्वी, नीलू बघेल वर्धा, सुमन बावणे आंजी. जिल्हा चिटणीस : विलास डोंगरे धनोडी, बुद्धेश्वर पाटील धानोली, विशाल पाटील मसाळा, राजेश पाचोडे जळगाव, रोहित बक्षी हिंगणघाट, मनोहर खंडाळे सिंदी रेल्वे, रोहित हांडे हिंगणघाट, प्रफुल रावेकर पुलगाव, सागर भगत हेलोडी, कैलास राखडे वर्धा. कोषाध्यक्ष : अरुण घोडिले थार, जिल्हा युवाप्रमुख : कमलेश लोखंडे आर्वी, जिल्हा युवती प्रमुख : शुभांगी भिवगडे आर्वी यांची निवड करण्यात आली आहे. कायम निमंत्रित सदस्य म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, पालकमंत्री, विधानसभा व विधान परिषदेचे आमदार, अनुसूचित जाती मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष वरुण पांडे, प्रमोद राऊत, विनोद माहुरे, श्याम शंभरकर. विशेष निमंत्रित सदस्य जिपचे माजी सदस्य ज्येष्ठ नेते फकीरा खडसे, नूतन राऊत, छाया घोडिले, पंसच्या माजी सभापती रेखा मतले यांची निवड करण्यात आली. यावेळी जयंत कावळे, वरुण पांडे, ज्ञानेश्वर गोटे, प्रवीण डोंगरे उपस्थित होते.