रात्री पुरुष गुगलवर काय सर्च करतात? 2025 च्या नव्या रिपोर्टने केला खुलासा

    दिनांक :31-Dec-2025
Total Views |

नवी दिल्ली,  

what-men-search-on-google-at-night रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत गुगलवर पुरुष नेमकं काय शोधतात, याचा उलगडा करणाऱ्या एका नव्या अभ्यासामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. २०२५ मध्येही हा ट्रेंड कायम असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. एकटेपणा, अस्वस्थता, कुतूहल आणि मनात चाललेले विचार यांचा मेळ घालत १५–१८ वर्षांच्या तरुणांपासून ते साठी ओलांडलेल्या पुरुषांपर्यंत विविध वयोगटांतील लोक रात्रीच्या शांततेत गुगलचा आधार घेत असल्याचे दिसून आले आहे. या काळात होणारे सर्च केवळ करमणुकीपुरते मर्यादित नसून, आयुष्य, नातेसंबंध, आरोग्य आणि मानसिक स्थितीशी संबंधित प्रश्नही मोठ्या प्रमाणावर विचारले जात आहेत.
 
 
what-men-search-on-google-at-night

अभ्यासानुसार मध्यरात्रीनंतर विशेषतः १२ ते २ या वेळेत ऍडल्ट कंटेंटशी संबंधित शोध मोठ्या प्रमाणावर वाढतात. उपलब्ध डेटानुसार अशा प्रकारचे सर्च पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेत तब्बल तीनपट अधिक आहेत. त्यानंतर रात्री साडेबारानंतर डेटिंग अॅप्सविषयी उत्सुकता वाढते. what-men-search-on-google-at-night टिंडर प्रोफाइल कसे आकर्षक करावे, योग्य डेटिंग ऍप कोणते, यासारखे प्रश्न मोठ्या प्रमाणावर शोधले जातात. रात्रीची उदासी आणि एकटेपणाची भावना या शोधांना चालना देत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.

पहाटेच्या सुमारास आरोग्याविषयीची चिंता डोके वर काढते. रात्री ३ वाजण्याच्या आसपास कर्करोगाची लक्षणे, मेंदूत ट्यूमर तर नाही ना, अशा भीतीदायक प्रश्नांचे सर्च वाढतात. झोपेतून जाग येताच अनेक जण ‘डॉक्टर गुगल’कडे धाव घेतात आणि त्यामुळे अनेकदा दिलासा मिळण्याऐवजी तणाव अधिक वाढतो. what-men-search-on-google-at-night याच काळात अंगदुखी, सांधेदुखी किंवा घरगुती उपाय यांसारखे शोधही केले जातात. गुगल जणू रात्रीचा फॅमिली डॉक्टरच बनतो.

नातेसंबंधांतील ताणतणावही रात्री अधिक तीव्र होतो. पत्नी किंवा जोडीदाराच्या वागणुकीबाबत शंका, नातेसंबंध सुधारण्यासाठी सल्ला, अशा स्वरूपाचे प्रश्न मध्यरात्रीनंतर वाढतात. what-men-search-on-google-at-night या वेळेत गुगल अनेकांसाठी समुपदेशकाची भूमिका बजावत असल्याचे अभ्यासातून दिसते. त्याचबरोबर फिटनेसविषयक शोधही रात्री उशिरा होतात. घरी व्यायाम कसा करावा, सिक्स पॅक कसे बनवावे, अशा कल्पना झोपण्याआधी मनात येतात आणि सकाळपासून व्यायाम सुरू करण्याचे संकल्प याच वेळी घेतले जातात.

एकटेपणा दूर करण्यासाठी अनेक जण रात्री ऑनलाइन गेम्सकडे वळतात. मोफत ऑनलाइन गेम्स किंवा उत्तम मोबाईल गेम्ससाठीचे सर्च या काळात लक्षणीयरीत्या वाढतात. अभ्यासानुसार रात्रीच्या वेळेत गेमिंगशी संबंधित शोध सुमारे ४० टक्क्यांनी वाढतात. काहींसाठी गुगल हा आभासी मित्र ठरतो. what-men-search-on-google-at-night याच दरम्यान एक अत्यंत संवेदनशील बाबही समोर आली आहे. पहाटे अडीचच्या सुमारास आत्महत्येपासून दूर राहण्याचे मार्ग, एकटेपणा कसा कमी करावा, अशा प्रकारचे शोध वाढताना दिसतात. अशा वेळी गुगल विविध हेल्पलाइन आणि सहाय्यक माहिती दाखवून मदतीचा हात देतो. हा अहवाल पुरुषांच्या मानसिक अवस्थेचे वेगळेच चित्र समोर आणत असून, रात्रीच्या शांततेत अनेकांच्या मनात सुरू असलेला संघर्ष उघड करतो.