रेतीमाफियांवर कारवाईची ‘टाच’

पैनगंगेतून विनानंबर ट्रॅक्टरसह लाखोंची रेती जप्त

    दिनांक :31-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
घाटंजी, 
sand-mafia-action : पैनगंगा नदीपात्रातील अवैध रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी पारवा पोलिस ठाणे अंतर्गत पोलिसांनी ठोस व धडक कारवाई करत रेतीमाफियांना जोरदार दणका दिला आहे. दातोडी शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर रेती वाहतूकीवर छापा टाकून पोलिसांनी विनानंबर ट्रॅक्टरसह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल ताब्यात घेतला. रविवार, 28 डिसेंबर रोजी सकाळी 8 च्या सुमारास पैनगंगा नदीपात्रातून विनापरवाना रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गोपाल राठोड तसेच सदोबासावळी दूरक्षेत्रातील व पोलिस अधिकारी कर्मचाèयांच्या पथकाने तत्काळ कारवाई केली.
 

sand 
 
 
 
कारवाईदरम्यान स्वराज कंपनीचा विनानंबर ट्रॅक्टर पकडण्यात आला. ट्रॅक्टरमध्ये 1 ब्रास रेती भरलेली आढळून आली. ट्रॅक्टर व रेती असा एकूण अंदाजे 5 लाख 700 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विशाल महादेव निंबरते व धनंजय रामदास वारे दोघेही (वरुडभक्त ता. आर्णी) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पैनगंगा नदीतील अवैध रेती उपसा व वाहतुकीवर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या कारवाईने रेतीमाफियांत खळबळ उडाली आहे.