अरे देवा जया बच्चनचे "तिखे बोल" नको ते बोलून गेल्या...

विधानामुळे तणाव वाढला

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
मुंबई,
paparazzi controversy अभिनेत्री जया बच्चन यांचे पापाराझींबाबतचे तिखट विधान सध्या चर्चेचा विषय बनले आहे. नुकत्याच ‘We The Women’ या शोमध्ये पत्रकार बरखा दत्त यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना जया बच्चन यांनी पापाराझींबाबत आपली असहिष्णुता स्पष्ट केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, “माझा पापाराझींशी कोणताही संबंध नाही; माझं त्यांच्याशी नातं शून्य आहे.” त्यांनी या वेळी पापाराझींना प्रशिक्षित नसलेले आणि फक्त फोटो काढण्याच्या उद्देशाने कार्यरत असल्याचे सांगत, त्यांना मीडिया म्हणता येणार नाही असा आरोप केला.
 

Jaya Bachchan, paparazzi controversy 
जया बच्चन paparazzi controversy यांनी स्पष्ट केले की, “मी मीडियाचं प्रॉडक्ट आहे. माझे वडील पत्रकार होते. अशा लोकांसाठी माझ्या मनात खूप आदर आहे. पण बाहेर उभे असलेले, घाणेरडी पँट घातलेले आणि मोबाईल हातात घेऊन फिरणारे लोक, जे नको त्या कमेंट्स करतात, त्यांच्यासाठी माझ्या मनात काही आदर नाही.” त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून पापाराझींच्या शिक्षण, बॅकग्राऊंड आणि उद्देशाबद्दल शंका व्यक्त केली.
 
 
जया बच्चन यांच्या या विधानामुळे पापाराझी मोठ्या प्रमाणात भडकले आहेत. काही पापाराझींनी तर अभिनेत्रीवर बहिष्कार घालण्याची धमकीही दिली आहे. पल्लव पालीवाल यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हटले की, “जया बच्चन यांचा नातू अगस्त्यचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जर पापाराझी प्रमोशन कव्हर करण्यासाठी उपस्थित नसतील, तर काय होईल? सेलिब्रिटी असल्याने आपल्याला या शब्दात बोलायला नको होते.”पापाराझी मानव मंगलानी यांनी देखील आपली नाराजी व्यक्त करत म्हटले, “जया बच्चन डिजीटल युगासोबत विकसित झाल्या नाहीत. प्रिंट ते डिजीटलमधील बदल समजून घेणे त्यांच्यासाठी कठीण आहे. युट्यूबर्स आणि वैयक्तिक कंटेंट क्रिएटर्समुळे या क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे. सेलिब्रिटींकडून प्रतिक्रिया मिळवण्यासाठी काहीही केले जात आहे, हे नैतिक नाही आणि यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे.”दरम्यान, एका पापाराझीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या पापाराझीने म्हटले की, “जया बच्चन आमच्या गरिबी, भाषे आणि कपड्यांबद्दल बोलतात, पण आम्ही कधीही कोणत्याही सेलिब्रिटीला त्रास दिला नाही. आम्ही आपली कामगिरी जाणतो. आम्ही चुकीचे नाही; आम्ही फक्त माणूस आहोत आणि तुमच्या जीवनाचा एक भाग आहोत.”
 
 
सध्या जया बच्चन paparazzi controversy आणि पापाराझी यांच्यातील हा वाद सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय बनला असून, सामान्य जनता, पत्रकार तसेच काही फिल्ममेकरही या विषयावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. जया बच्चन यांच्या विधानावरून पापाराझी क्षेत्रात तीव्र भावना निर्माण झाली असून, पुढील काळात या वादाचा पुढे काय परिणाम होईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.