वर्धा,
BDO Sunita Marskolhe आर्वी पंचायत समितीत घडलेल्या रोजगार हमी योजनेच्या ७० लाखांहून अधिकच्या निधीचा अपहार प्रकरणी आर्वी पोलिसांनी बडतर्फ सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसर यांच्यानंतर आर्वीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांना अटक केली. सध्या बीडीओ मरसकोल्हे पोलिस कोठडीत आहेत. बीडीओ पदावरील शासकीय अधिकार्याची कुठल्या गुन्ह्यात आरोपी म्हणून अटक होत सलग किमान ४८ तासांची सेवा बाधित होत असल्यास संबंधित अधिकार्यास निलंबीत करण्यात येते. हा निलंबनाला आदेश महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग काढतो. बीडीओ मरसकोल्हे सध्या पोलिस कोठडीत असून निलंबनाची शिफारस पोहोचताच त्यांच्या निलंबनाचा आदेश कुठल्याही क्षणी निघण्याची शयता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.
पंस गटविकास अधिकार्याला निलंबित करण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या अनुच्छेद ९७ व ९८ नुसार गटविकास अधिकारी शासनाकडून नियुत केले जातात. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा अधिकार राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेला आहे. गटविकास अधिकारी हे पंचायत समितीचे कार्यकारी अधिकारी व सचिव असतात. शिवाय त्यांची निवड महाराष्ट्र शासनाकडून होते. त्यामुळे त्यांच्या कर्तव्यात कसूर किंवा गैरवर्तणूक आढळल्यास त्यांना निलंबित करण्याचे अधिकार ग्रामविकास विभागाला आहे.
एखाद्या गटविकास BDO Sunita Marskolhe अधिकार्याने कर्तव्यात कसूर किंवा गैरवर्तणूक केली असल्याचे आढल्यास विभागीय आयुतांमार्फत शासनाच्या ग्रामविकास विभागाला संबंधितावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी अहवाल पाठविण्याचे अधिकार जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना आहे. बीडीओ मरसकोल्हे यांच्या प्रकरणात आर्वी पोलिसांकडून अहवाल प्राप्त होताच जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना विभागीय आयुतांना आपला अहवाल सादर करावा लागणार आहे. तर विभागीय आयुत संबंधित अहवालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविभाग विभागाला बीडीओ मरसकोल्हे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस करणारा अहवाल पाठवतील, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
घरझडतीत आढळली ६० हजारांची रोख
मनरेगा निधी गिळंकृत BDO Sunita Marskolhe प्रकरणातील सहआरोपी असलेल्या बीडीओ सुनीता मरसकोल्हे या सध्या तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत आहेत. बुधवारी आर्वी पोलिसांनी त्यांच्या आर्वी येथील निवासस्थानाची झडती घेतली. यात पोलिसांना ६० हजारांची रकम मिळाली. ती पोलिसांनी जप्त केल्याचे वृत्त आहे.