रशियाचे आमदारा असलेल्या अभय सिंगचे मोठे वक्तव्य!

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Bihar's Abhay Singh MLA from Russia रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी, बिहारच्या पटन्यात जन्मलेले आणि सध्या रशियन संसदेत आमदार असलेले अभय सिंग यांनी भारताला एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की भारताने रशियाकडून अत्याधुनिक S-500 संरक्षण प्रणाली मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, ही प्रणाली सध्या केवळ रशियातच वापरली जाते आणि ती कोणत्याही देशाला निर्यात केलेली नाही.
 
 
Bihar
माध्यमाशी बोलताना सांगितले की, “S-400 ही प्रभावी क्षेपणास्त्र प्रणाली भारताकडे आधीच आहे, परंतु S-500 हे पुढील पिढीचे तंत्रज्ञान आहे. रशिया ते भारताला देण्यास तयार झाला, तर चीनसुद्धा ज्यांच्याकडे नाही अशी ही प्रणाली मिळवणारा भारत पहिला देश ठरेल.” त्यांनी पुढे सुखोई-57 लढाऊ विमानांचेही कौतुक करत, भारताने या क्षेत्रात आक्रमकपणे पुढाकार घ्यावा असे मत व्यक्त केले. सिंग हे पुतिन यांच्या पक्षाचे सदस्य असून युक्रेन सीमेवरील रणनीतिक दृष्ट्या महत्त्वाच्या कुर्स्क प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात. ते 1991 मध्ये पटनाहून सोव्हिएत संघात वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते.
 
 
कुर्स्क मेडिकल युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतल्यानंतर काही काळ पटना येथे डॉक्टर म्हणून काम केले, परंतु नंतर पुन्हा रशियात जाऊन औषध व्यवसाय आणि रिअल इस्टेट क्षेत्रात मोठे यश मिळवले. 2017 आणि 2022 मध्ये त्यांनी रशियन विधीमंडळाच्या निवडणुका जिंकल्या. स्वतःला “बिहारचा माणूस, ज्याच्या DNA मध्ये राजकारण आहे” असे ते विनोदाने म्हणतात. दरम्यान, पुतिन यांचा हा भारत दौरा चार वर्षांनंतर होत असून दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीला नवे अधोरेखित करणारा ठरणार आहे. गुरुवारी संध्याकाळी पुतिन नवी दिल्लीला पोहोचतील आणि त्याच रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी खाजगी डिनरचे आयोजन करतील. शुक्रवारी सकाळी राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत होईल आणि त्यानंतर 23 वी भारत-रशिया शिखर परिषद हैदराबाद हाऊस येथे होणार आहे.