महाविद्यालयात बुरखाबंदीवरून तणाव; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पोलिसांचा बंदोबस्त

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
मुंबई,
burqa ban college गोरेगाव येथील विवेक महाविद्यालयात लागू करण्यात आलेल्या बुरखाबंदीच्या निर्णयामुळे गुरुवारी सकाळपासून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थिनींनी कॉलेज गेटजवळ आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाचा विस्तार होताच एमआयएमच्या नेत्या जहांआरा शेख या देखील विद्यार्थिनींच्या समर्थनासाठी घटनास्थळी पोहोचल्या. वाढत्या गर्दी आणि वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला.
 

burqa ban college 
विद्यार्थिनींची मुख्य burqa ban college मागणी म्हणजे कॉलेज प्रशासनाने लादलेली बुरखाबंदी तात्काळ मागे घ्यावी. सकाळपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली. काही वेळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत विद्यार्थिनींना कॉलेज गेटपासून दूर केले. दुपारपर्यंत बहुतांश विद्यार्थिनी घरी परतल्या, मात्र परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्णच राहिले.या आंदोलनाला एमआयएमकडून पाठिंबा मिळाल्यानंतर दुपारनंतर मनसेचे कार्यकर्ते देखील कॉलेजच्या बाहेर दाखल झाले. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “ही शाळा आणि ज्युनियर कॉलेज आहे. येथे अकरावी–बारावीचे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची ओळख पटणे आवश्यक असते. त्यामुळे स्कार्फ किंवा बुरखा घालून आल्यास सुरक्षारक्षकांना अडचण निर्माण होते. परीक्षांमध्ये गैरप्रकार होऊ नयेत यासाठीही काही नियम पाळणे गरजेचे आहे. आमचा कोणत्याही धर्माचा विरोध नाही, परंतु शैक्षणिक परिसरात शिस्त राखली गेली पाहिजे.”
 
 
दुसरीकडे, आंदोलक विद्यार्थिनींचा ठाम आग्रह आहे की बुरखाबंदी हा निर्णय एकतर्फी असून त्यात धर्मस्वातंत्र्याचा भंग होत आहे. त्यामुळे तो तातडीने रद्द करावा, अशी त्यांची मागणी आहे.पोलिस बंदोबस्ताच्या उपस्थितीत सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी या निर्णयावरून पुढील काही दिवसांमध्ये नव्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.