सायकलवर निघालेल्या व्यक्तीवर कारची जोरदार धडक;सीसीटीव्हीत कैद भयंकर घटना

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |

गुरुग्राम, 

car-hits-person-on-bicycle-gurugram गुरुग्रामच्या डीएलएफ फेज-२ पोलिस स्टेशन परिसरातील आकाशनीम मार्गावर सायकलवरून निघालेल्या ५८ वर्षीय व्यक्तीवर मागून येणाऱ्या पांढऱ्या सॅन्ट्रो कारने धडक दिली. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. सायकलस्वाराचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
 
 
car-hits-a-person-on-a-bicycle

ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, आरोपी कार चालकाचा शोध जोरात सुरु आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या घराबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख अमिताभ जैन अशी केली आहे, जो डीएलएफ फेज-२ मधील बोगनविले मार्गावर राहणारा होता. तो रोजच्या मॉर्निंग वॉकसाठी आकाशनीम मार्गावर गेला होता. car-hits-person-on-bicycle-gurugram सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते की कार जास्त वेगाने चालत नव्हती, मात्र सायकलस्वारावर धडक दिल्यानंतर चालक पळून गेला.

 
सौजन्य : सोशल मीडिया 

अमिताभ जैन १० वर्षांपूर्वी दिल्लीत औषध व्यवसाय करत होता आणि त्यानंतर गुरुग्राममध्ये डीएलएफ फेज-२ मध्ये स्थलांतर झाला. त्याची पत्नी दिल्लीतील संसद संग्रहालयात संरक्षक आहे, एक मुलगा लंडनमध्ये आयटी कंपनीत काम करतो, तर मुलगी बेंगळुरूमध्ये राहते. car-hits-person-on-bicycle-gurugram अपघातानंतर कुटुंबीयांनीही घातपाताचा संशय व्यक्त केला असून, पोलिस सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, कारचा नंबर ओळखला गेला असून, आरोपी चालकाला लवकरच अटक केली जाईल. कारवर दिल्लीची नंबर प्लेट होती आणि तपास पुढे सुरू आहे.