चंद्रपूर केंद्रातून ‘तांडा’ प्रथम !

chandrapur-marathi-drama 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
चंद्रपूर,
 
 
chandrapur-marathi-drama 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत चंद्रपूर केंद्रातून नवोदिता या संस्थेच्या ‘तांडा’ या नाटकाला प्रथम आणि चंद्रपूरच्या सर्वोदय शिक्षण मंडळ संस्थेच्या ‘कर्नल सरंजामे आणि ती’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी गुरूवार, 4 डिसेंबर रोजी केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
 
 
 

chandrapur-marathi-drama 
 
 (विजेत्या नाटकातील एक दृश्य)
 
chandrapur-marathi-drama तसेच यवतमाळ येथील कलारसिक या संस्थेच्या ‘फेस टू फेस’ या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. ‘तांडा’ या नाटकाचे दिग्दर्शक प्रशांत कक्कड यांनी दिग्दर्शनाचा प्रथम पारितोषिक पटकावला असून, द्वितीय पारितोषिक संजय रामटेके (नाटक-कर्नल सरंजाने आणि ती), तृतीय पारितोषिक ऋषीकेश निवल (नाटक- फेस टू फेस) आणि प्रकाश योजना प्रथम पारितोषिक मिथुन मित्रा (नाटक- तांडा), द्वितीय पारितोषिक शिवशंकर माळोदे (नाटक- कर्नल सरंजामे आणि ती), तृतीय पारितोषिक हेमंत गुहे (नाटक चितपट) यांना मिळाला आहे. नेपथ्य प्रथम पारितोषिक संकेत पगारे (नाटक- कर्नल सरंजामे आणि ती) द्वितीय पारितोषिक रुपाली धकाते (नाटक- तीन पायांची शर्यत), तृतीय पारितोषिक सूरज चिकटवार (नाटक- चितपट) तसेच रंगभूषा प्रथम पारितोषिक ज्योती करणुके (नाटक- तांडा), द्वितीय पारितोषिक शैला सज्जनवार (नाटक- देहभान), तृतीय पारितोषिक ज्ञानेश्वर सोनटक्के (नाटक- विठू रखुमाय) यांना प्राप्त झाला आहे.
 
 
 
 
chandrapur-marathi-drama संगीत दिग्दर्शन प्रथम पारितोषिक वैभव पाराशर (नाटक- तांडा), द्वितीय पारितोषिक आलेख कोटंरगे (नाटक- कर्नल सरंजामे आणि ती), तृतीय पारितोषिक उत्पल टोंगो (नाटक- भूत झोंबलं तात्याला) तसेच वेशभूषा प्रथम पारितोषिक मुग्धा खत्री (नाटक-तांडा), द्वितीय पारितोषिक आश्विनी निवल (नाटक-फेस टू फेस), तृतीय पारितोषिक निकिता गोरे (नाटक- दि अ‍ॅनॉनिमस) यांनी पटकावला आहे. तर उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक प्रशांत कक्कड (नाटक-तांडा) व कल्याणी बोरकर (नाटक-तांडा), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे अविश बन्सोड (नाटक- श्री नॉट थ्री), गौरव सातपुते (नाटक-काळ्या मुलीच मॅरेज), डॉ. अनिरुध्दजीत नरखेडकर (नाटक-फेस टू फेस), डॉ. प्रजेश घडसे (नाटक-कर्नल सरंजामे आणि ती), प्रिया कांडूरवार (नाटक- देहभान), शरयु कुबेर (नाटक- तीन पायांची शर्यत), डॉ. प्रणाली वायकर (नाटक फेस टु फेस), सुमेधा श्रीरामे (नाटक- कर्नल सरंजामे आणि ती) यांना घोषित झाले आहे.
 
 
 
 
chandrapur-marathi-drama 11 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या स्पर्धेत एकूण 14 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून वैभव मावळे, विजय रावल आणि रुपाली कोंडेवार यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकांच्या संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले.